Bride Dancing in Rain video: आजकाल हवामानाचा काहीच नेम नाही हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. ढग कधीही आकाशात येतात आणि पाऊस पडतो, क्षणात तो पाऊस जातो सुद्धा. अशा परिस्थितीमुळे अनेक लग्ने पुढे ढकलली जातात किंवा वधू-वरांना वाट पाहावी लागते. पण असे अनेक लोक आहेत जे परिस्थिती कशीही असली तरी आपल्या लग्नाचा मनमुराद आनंद घेतात. ते असे काहीतरी कोणत्याही अडथळ्याने नाराज होत नाहीत तर ते उलट त्यातही मजा घेतात. आता पाहा हा व्हिडिओ, पाऊस असूनही आपल्या हळदीच्या कार्यक्रमात नवरीनं भन्नाट असा डान्स केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही या नवरीचं कौतुक कराल एवढं नक्की.

लग्नाचे व्हिडिओ इतर कोणत्याही व्हिडिओपेक्षा वेगाने व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या लोकांमध्ये चर्चेत आहे.लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो. लग्न केवळ दोन व्यक्तींना नाही तर दोन कुटुंबांना एकत्र आणतं. आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात.दरम्यान अशाच एका नवरीने आपल्याच हळदीला भन्नाट डान्स केला आहे. म्हणतात ना, आयुष्य खूप सुंदर आहे पण ते आनंदाने जगता यायला पाहिजे. व्हायरल व्हिडीओ पाहून आनंदाने प्रत्येक क्षण कसा जगता येतो हे समजेल. नवरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, संपूर्ण वातावरण पावसामुळे भिजून गेलं आहे. मंडपात जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत, संपूर्ण मंडप पावसाच्या पाण्यानं गळत आहे. असं असतानाही नवरीच्या डोळ्यात अश्रु न येता तिचा चेहरा उत्साहाने फुललेला आहे. हातात बांगड्या, डोक्यावर फुलांची वेणी आणि अंगभर हळदीचा रंग घेऊन ती आनंदाने मनोक्त नाचताना दिसत आहे. अनेक भारतीय परंपरांमध्ये, लग्नाच्या दिवशी पाऊस पडणे हा एक शुभ संकेत मानला जातो. पण, अनेक भारतीय असे मस्करीत सुद्धा म्हणतात की, जेव्हा तुमच्या लग्नाच्या दिवशी पाऊस पडलं की समजून जायचे नवरा किंवा नवरी कढईत नक्कीच जेवले असतील.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Laxmi Jadhav (@laxmijadhav325)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लग्नसोहळा, एखादा कौटुंबिक कार्यक्रम आणि डान्स हे आता एक समीकरणच बनलं आहे. एखाद्या घरात लग्नकार्य असलं, तर खास डान्स करण्यासाठीही विशेष कार्यक्रम ठेवण्याची पद्धत आता हळूहळू सुरू होतेय. अशा कार्यक्रमांमध्ये घरातली पुरुष मंडळीच काय, महिलादेखील डान्स करण्यात आघाडीवर असतात.