लोक कित्येकदा मजा मस्करी करण्याच्या नादात स्वत:सह दुसऱ्यांचे आयुष्य धोक्यात टाकतात. आजकाल रिल्स तयार करण्याच्या नादात कित्येक तरुण खरे आयुष्य विसरून जातात. असेच काहीसे दिल्लीमध्ये घडले. दिल्लीमध्ये एक नवरी बिनधास्तपणे स्कूटीवर फिरताना दिसत आहे तेही हेल्मेट परिधान न करता. आता दिल्ली पोलिसांच्या ती नजरेस पडल्यानंतर ते तिला कसे सोडतील? दिल्ली पोलिसांनी लोकांना संदेश देत या महिलेचा व्हिडिओ आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.

दिल्ली पोलिसांनी आकारला दंड

व्हिडिओमध्ये, ही महिला नवरीच्या वेशात दिसत आहे. तिने लेंहगा, ज्वेलरी परिधान करून नटलेली नवरी वेगात स्कुटी चालवताना दिसत आहे. बॅकग्राऊंडला ‘सजना जी वारी वारी’ हे गाणे ऐकून येत आहे. दिल्ली पोलिसांनी या एडीट केलेल्या व्हिडिओनंतर एक डॉक्युमेटदेखील शेअर केले आहे. या डॉक्यूमेंटमध्ये नवरीकडून हेल्मेट न वापल्यामुळे आणि ड्रायव्हिंग लायसेन्स नसल्यामुळे ५००० रुपयांचा दंड आकाराल्याचे दिसते आहे.

हेही वाचा – ‘डोसा, समोसा, जिलेबी, फ्राइड राईस…’ तुम्हीही अमरनाथ यात्रेला जाणार असाल तर जाणून घ्या कोण कोणत्या खाद्यपदार्थांवर घातली बंदी

दिल्ली पोलिसांनी लोकांना दिला संदेश

दिल्ली पोलिसांनी शेअर केलेल्या व्हिडिओसह लोकांना संदेश दिला आहे. ”रस्त्यावर रिल्स तयार करणे तुमच्यासह इतरांची सुरक्षा धोक्यात टाकते आहे. कृपया असा मुर्खपणाकरू नका आणि सुरक्षितपणे ड्राइव्ह करा. ”

हेही वाचा – डॉक्टर, पोलिस, सैनिक… विराट कोहलीचा दशावतार पाहिला का? AI फोटो पाहून यूजर्स म्हणाले, ‘तो फक्त क्रिकेट…’

लोकांचे पोलिसांचे केले कौतूक

ट्विटरवर लोकांनी दिल्ली पोलिसांचे समर्थन केले आहे. एकाने सांगितले की, ‘अशा प्रकारच्या गुन्हासाठी आयपीसी कलम लावेल पाहिजे.’ दुसऱ्याने म्हटले की,’मस्त! सामाजिक संदेश देण्यासाठी काय कमाल युक्ती शोधली आहे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही घटना दिल्ली पोलिसांनी एका महिलेला दंड केल्याची आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये दोन महिलांनी हेल्मेटशिवाय प्रवास करणाऱ्या पोलिसांचा पाठलाग केला होता. पोलिसांच्या मागून येणाऱ्या स्कूटीवर बसलेल्या एका महिलेने हा व्हिडिओ तिच्या फोनवरून रेकॉर्ड केला आहे. या प्रकरणाची तात्काळ दखल घेत गाझियाबाद पोलिसांनी अधिकाऱ्यांना १००० रुपयांचे दंड आकारला होता