Social media Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यापैकी बरेचसे व्हिडीओ आपले मनोरंजन करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक नवरी स्कुटी चालवत लग्नापासून पळून जाण्याचा सल्ला देत आहे. नवरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत असून या व्हिडिओने सर्वांची मने जिंकली आहेत.

नवरीने स्कूटीवरुन काढला पळ

या व्हिडिओमध्ये एक आनंदी नवरी स्कूटी चालवताना दिसत आहे. या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर अॅक्शन रिप्ले चित्रपटातील ‘जोर का झटका ही जोरो से लगा’ हे प्रसिद्ध गाणे वाजत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही वधूला हे गाणे गुणगुणतानाही पाहू शकता. हा ट्रेंडिंग व्हिडीओ तुम्हीही एकदा पहाच…

(हे ही वाचा: Video: हत्तीण देत ​​होती पहिल्यांदा पिल्लाला जन्म, मदतीसाठी धावून आला हत्तींचा कळप; घेराव घालत असे काही केले की…)

( हे ही वाचा: वाघासोबतचा अतिउत्साही महिलेचा Video वेगळ्याच कारणामुळे चर्चेत; जाणून घ्या नेमकं घडलं काय)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडिओ पाहून लोक हसायला लागले

लग्नापासून वाचण्याची ही संधी आहे, असे म्हणत नवरी रस्त्यावर स्कूटी चालवत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. गाण्याच्या बोलानुसार, नवरी म्हणते की स्वतःला लग्नाच्या बंधनातून बाहेर काढता येऊ शकते. या नवरीच्या चेहऱ्यावरचे भाव कोणत्याही चित्रपटातील नायिकेपेक्षा कमी नाहीत. या कॉमेडी व्हिडिओवर अनेक यूजर्स वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. या व्हिडिओला खूप लाईक्स आणि व्ह्यूज देखील मिळत आहेत.