आतापर्यंत नववधू म्हटली की लाजरी, नखशिखांन्त नटलेली, भरजरी शालू किंवा लेहंगा चोळी, शृंगार केलेली स्त्री डोळ्यासमोर उभी राहते. हो ना? पण ही संकल्पना आताच्या घडीला बदलत चालली आहे. ती मुक्त आहे, स्वतंत्र आहे आणि तिला कोणतेही बंधन अडवू शकत नाही हे ती दाखवून देते. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असेल्या नवदाम्पत्यांचा फोटो हेच तर सांगतो. कदाचित अनेकांना हा फोटो पाहून आक्षेप वाटेलही पण ‘ती’ मात्र या मानसिकतेचा विचार अजिबात करत नाही.

वाचा : कॅन्सरशी लढा देणाऱ्या त्या विद्यार्थिनीने ICU मध्ये पाहिला बारावीचा निकाल

पारंपरिक कपड्यात तिचा होणारा नवरा नटून आलाय. तीसुद्ध आपल्या आयुष्यातल्या खास क्षणांसाठी नटून आलीय. सोन्याचे दागिने, कपाळावर कुंकू, डोक्यावर लाल रंगाची ओढणी अशा पारंपारिक वेशात तिनेही लग्नमंडपात प्रवेश घेतला. पण तिच्यातल्या एका गोष्टीने मात्र तिच्यामधली ‘बंडखोर’ स्त्री प्रकर्षाने जाणवली. ती तयार तर अगदी सामान्य नववधूसाखी झाली होती पण एक गोष्ट मात्र तिने सगळ्यांपेक्षा वेगळी केली. ती म्हणजे भरजरी आणि अगदी दहा एक किलो जड असणाऱ्या लेहंगा घालून लग्नमंडपात प्रवेश करण्यापेक्षा तिने चक्क जिमच्या शॉर्ट पँटवर लग्न मंडपात प्रवेश केला होता. त्या नववधूमधला तो बंडखोरपणा जाणवतही होता. पण तिच्याबद्दल कोणत्याही उलट सुलट चर्चा न करता आपल्या भावी पत्नीतल्या त्या बंडखोरीचा तो आदरही करत होता. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर या जोडप्यांबद्दल अनेक संमिश्र प्रतिक्रिया येत होत्या खऱ्या पण ‘कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना’ असं म्हणतं हे जोडपं मात्र आपलं लग्न छान एन्जॉय करत होतं.

वाचा : …..पण बघ्यांची चीड येते, विनयभंगाच्या प्रयत्नानंतर विद्यार्थिनीची हृदयद्रावक पोस्ट