Viral Video : बहिणी भावाचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, जिव्हाळा, काळजी, आपुलकी असते. बहिण भाऊ कितीही भांडले तरी एकमेकांशिवाय राहू शकत नाही. सोशल मीडियावरही बहिण-भावांचे अनेक गोंडस व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके मजेशीर असतात की पोट धरुन हसायला येते. सध्या असाच एक बहिण भावाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकला “शुभंकरोति कल्याणम…” ही प्रार्थना म्हणताना दिसत आहे पण मध्येच त्याची चिमुकली बहिण येते आणि मध्येच लुडबूड करते. बहिणीची लुडबूड ऐकून तो गोंधळतो आणि मध्येच प्रार्थना म्हणताना थांबतो. हा गोड व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. या बहिण भावाचे गोंडस नाते पाहून तुम्हाला तुमचे बहिण भाऊ आठवू शकतात. काही लोकांना हा व्हिडीओ पाहून त्यांच्या बालपणाची आठवण सुद्धा येऊ शकते.
हेही वाचा : Mumbai Video : मुंबई लोकलमध्ये जपताहेत भजनाची परंपरा, तुम्ही पाहिला का व्हिडीओ?
dr_vishal_gore या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुमची पण छोटी बहीण असच करते का?”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “किती गोड मुलं आहेत” तर एका युजरने लिहिलेय, “बालपणाची आठवण आली” काही युजर्सनी हसण्याचे इमोशी शेअर केले आहेत.