scorecardresearch

Premium

Mumbai Video : मुंबई लोकलमध्ये जपताहेत भजनाची परंपरा, तुम्ही पाहिला का व्हिडीओ?

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही लोकांचा एक समुह लोकल ट्रेनमध्ये भजन गीत गाताना दिसत आहे. त्यांचे हे भजन ऐकून तुम्हीही दंग व्हाल.

Mumbai local train Video group of people sing a bhajan song and keep tradition video goes viral on social media
मुंबई लोकलमध्ये जपताहेत भजनाची परंपरा, तुम्ही पाहिला का व्हिडीओ? (Photo : Instagram)

Mumbai Local Train : मुंबईसाठी लोकल हा जिव्हाळ्याचा विषय आहे. मुंबईची लाइफलाइन असणाऱ्या लोकलमधून दरदिवशी हजारो लोक प्रवास करतात. या मुंबई लोकलमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ तर थक्क करणारे असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही लोकांचा एक समुह लोकल ट्रेनमध्ये भजन गीत गाताना दिसत आहे. त्यांचे हे भजन ऐकून तुम्हीही दंग व्हाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तबल्याच्या तालावर एक व्यक्ती भजन गीत गाताना दिसत आहे आणि त्यांच्या आजुबाजूला असणारे मंजीरा वाजवून त्यांना सुर देत आहेत. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की हे सर्व “एकवीरेची पाहत होते वाट..” हे सुरेख भजन गीत गात आहेत. त्यांचा सुमधूर आवाज ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
हा एकच व्हिडीओ नाही तर असे अनेक व्हिडीओ आहे. त्यात ते लोकलमध्ये भजन गीत गात आहेत. लोकलमध्ये भजनाची ही अनोखी परंपरा ही लोक जपत आहेत. त्यांच्या या स्तुत उपक्रमाचे सोशल मीडियावर खूप कौतुक केले जात आहेत.

Who is Mufti Salman Azhari
…म्हणून वडोदरा पोलिसांनी इस्लामिक धर्मगुरूला पुन्हा केली अटक, कोण आहेत मुफ्ती सलमान अझहरी?
enjoy every moment death is unexpected quote written on back of auto rickshaw video goes viral
रिक्षामागे पठ्ठ्याने लिहिले असे की Video पाहून युजर्स म्हणाले, “बरोबर बोललास भावा…”
a street vendor boy made Maggi with coffee and milk
‘कॉफीवाली मॅगी!’ तरुणाने चक्क कॉफीमध्ये शिजवली मॅगी, मॅगीच्या विचित्र रेसिपीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
khandeshi dance
अस्सल खानदेशी! पारंपारिक खानदेशी डान्स वर थिरकले तरुण मंडळी; व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा : “लोणच्यामध्ये आवडते मला कैरीची फोड…” बायकोचा उखाणा ऐकून नवरा चक्क लाजला, व्हिडीओ एकदा पाहाच…

suhas_bandagale_19 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या अकाउंटवर लोकल ट्रेनमधील असे अनेक भजनाचे व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हायरल व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिलेय, “अशा माणसांमुळेच आपल्या रुढी, परंपरा टिकून आहेत” तर एका युजरने लिहिलेय, “हा व्हिडीओ बघून सगळं टेन्शन गेलं” आणखी एका युजरने लिहिलेय, “हा सुख सोहळा स्वर्गी नाही”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai local train video group of people sing a bhajan song and keep tradition video goes viral on social media ndj

First published on: 15-09-2023 at 14:00 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×