सोशल मीडियावर रोज कित्येक व्हिडिओ सतत समोर येत असतात. व्हायरल व्हिडीओचा सतत आपल्यावर भडीमार होत असतो. ज्यामध्ये काही व्हिडिओ भांडणाचे असतात, काही अपघातांचे असतात तर काही विचित्र व्हिडिओ असतात. कधी डान्सचे व्हिडिओ व्हायरल होतात तर कधी खाद्यपदार्थांचे. सततच्या समोर येणार्‍या व्हिडीओमध्ये मोजके व्हिडिओ असे असतात जे लोकांचे मन जिंकतात. अनेक लोक ट्रेंडिंग गाण्यावर डान्स किंवा अभिनयाचे व्हिडिओ पोस्ट करतात पण एखादाच व्हिडिओ असा असतो की जो लोकांच्या पसंतीस उतरतो. सध्या अशाच एक व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ एका प्रसिद्ध मराठी लावणी गीतावरील आहे. एक तरुणीने मराठमोळा श्रृंगार करत या गाण्यावर अभिनय केला आहे जो लोकांना प्रचंड आवडला आहे.

इंस्टाग्रामवर srushti_zemse_____3 नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये तरुणी बुगडी माझी सांडली गं या प्रसिद्ध लावणीवर अभिनय आणि नृत्य करत आहे. तिचा अभिनय, तिच्या अदा, चेहऱ्यावरील हावभाव सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तरुणीने अस्सल मराठमोळा साज केला आहे जो प्रेक्षकांचे मनाला भावला आहे. तिने केसांचा आंबाडा घातला आहे आणि केसांची एक बट मोकळी सोडली आहे. कपाळावर लाल कूंक लावले आहे, डोळ्यात काजळ घातलं आहे, नाकात नथ अन् कानात मोत्याचा झुमका घातला आह. गळ्यात ठुशी अन् हार घातला आहे. तसेच परकर-पोलका असा पांरपारिक पोशाखही तिने परिधान केला आहे. नेटकऱ्यांना तिचा मराठमोळे रूप खूप आवडले आहे.

नव्या हिंदी, इंग्रजी गाण्यांच्या ट्रेंडमध्ये मराठी गाणी मागे पडत आहे अशा परिस्थितीमध्ये मराठी गीतांवर अभिनय करून मराठी लोककला सादर करून ही तरुणी मराठी परंपरा जपत आहे त्याबद्दल अनेकांनी तिचे कौतुक केले.

व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की,”या पिढीमध्ये अशी कला पाहणे खरंच विलक्षण आहे. खूप पुढे जा.”

दुसऱ्याने लिहिले की, “ताईने जुन्या आठवणींना उजाळा दिला.”

तिसऱ्याने,”कमला आहेस तू, काय एक्स्प्रेशन आहे.”

चौथ्याने कमेंट केली की,”जयश्री गडकर यांच्या तूच”

पाचव्याने लिहिले की,” एकच नंबर खूप खूप सुंदर हाव भाव खूप छान कलाकार आहेस तू”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.