सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. ट्विटर, इन्स्टा, यूट्यूबवर रोज लाखो व्हिडीओ अपलोड केले जातात. पण, त्यातील काही मोजकेच व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरतात. त्यानंतर ते व्हिडीओ सर्वत्र शेअर होत राहतात. काही व्हिडीओ हसवतात. पण, काही व्हिडीओ घाबरगुंडी उडविणारे असतात; जे पाहिल्यानंतर आपण क्षणभर भांबावून जातो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

तुमच्यापैकी अनेकांनी शेतात खांबाला माणसाप्रमाणे कपडे घालून उभं केलेलं बुजगावणं पाहिलं असेल. त्या खांबाच्या वरच्या बाजूला एक मडकं असतं; ज्यावर भयानक वाटणारा चेहरा रेखाटलेला असतो. शेतातील पिकांवरील पाखरं हाकण्यासाठी हे बुजगावणं उभं केलं जातं. पण, व्हायरल झालेल्या व्हिडीओत इतकं भीतीदायक बुजगावणं शेतात उभं केलं गेलंय; जे पाहून कोणालाही घाम फुटेल. त्यात जर ते कोणी रात्री पाहिलं, तर भीतीनं त्याची झोप कायमची उडेल. हे बुजगावणं पाहणाऱ्या व्यक्तीला रात्री आपण खरंच भूत पाहतोय की काय, असा भास होऊ शकेल.

सर्वसाधारण बुजगावणी स्थिर उभी करून ठेवलेली असतात. पण या व्हिडीओत दिसणारं बुजगावणं वाऱ्याच्या वेगाबरोबर हलताना दिसतंय. हेलकावे देत उड्या मारतंय. विशेष म्हणजे या बुजगावण्याला चक्क माणसाच्या खोपडीच्या आकाराचा मुखवटा लावलाय आणि हातात सायकलचं स्टेअरिंग फिट केलंय. त्यामुळे ते बुजगावणं दिसताना आणखीनच भीतीदायक दिसतोय. जर रात्री चुकून कोणी हे बुजगावणं पाहिलं, तर त्याला आपण खरंच भूत पाहतो आहोत की काय, असा भास होऊ शकतो.

पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल

त्यामुळे साहजिकच ज्यांनी ज्यांनी हा व्हिडीओ पाहिला, त्यांनी त्यांनी तो भीतीदायक असल्याचंच म्हटलं आहे. हा व्हिडीओ @Gulzar_sahab नावाच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

गॅस लायटरने शेगडी पेटत नाहीये? मग थांबा! फेकून देण्याआधी करुन पाहा ‘ही’ सोप्पी ट्रिक

हा व्हिडीओ शेअर करताना अकाउंट युजरने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, ‘रात्री हे पाहून शेतमालक स्वतः घाबरतील.’ हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ९० हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

त्यावर एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “बुजगावण्याला तर चलता-फिरता भूत बनवून टाकला.” दुसऱ्या एका युजरने लिहिलंय, “डर के आगे जित है.” तर अनेकांनी व्हिडीओवर हसण्याच्या इमोजी शेअर केल्यात.