Bull Attack Viral Video : अनेक जण रस्त्यावरून चालताना आरामात फोनवर बोलत जात असतात. त्यांना आपल्या आजूबाजूला काय घडतंय, भरधाव वाहन जातायत याचं काहीचं पडलेलं नसतं. ते आपल्याच तंद्रीत चालत असतात. याच कारणामुळे अनेकदा अपघातांच्या घटना घडतात, ज्याचे अनेक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होतात. दरम्यान, अशाच एका अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो पाहिल्यानंतर रस्त्यावर चालताना फोनवर बोलणं किती जीवघेणं ठरू शकतं याची जाणीव होईल.
घरच्यांकडून अनेकदा सांगितलं जातं की, रस्त्यावरून चालताना फोनवर बोलू नका. त्याऐवजी मोबाईल बॅगमध्ये ठेवा; पण सर्वार्थानं सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक असलेल्या या प्राथमिक सूचनेकडे दुर्लक्ष केलं जातं. पण, असं करणं किती जीवघेणं पडू शकतं हे या व्हिडीओतून दिसतंय.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, बाजार गजबजलेला आहे, लोकांसह वाहनांचीही वर्दळ सुरू आहे. याच बाजारामध्ये एक तरुण रस्त्याच्या कडेला स्कुटीवर आरामात हात ठेवून फोनवर बोलत उभा होता. त्याला आपल्या आजूबाजूला पाठीमागे कोण आहे याबाबत कशाचीच जाणीव नव्हती. तो बोलत असतानाच पाठीमागून एक मोठा बैल आला आणि त्यानं शिंगांनी त्याला धडक देत उडवून दिलं. बैलाच्या धडकेमुळे तरुण मोबाईलसह रस्त्यावर जोरात कोसळला. त्या जोरदार धडकेमुळे त्याला दुखापत तर झालीच असेल; पण तरीही तो स्वत:ला सावरत पटकन उठून बाजूला झाला. बैल आक्रमक झाला होता आणि त्याचे भाव असे होते की, जणू त्याच्यासमोर उभी असलेला व्यक्ती त्याच्या मार्गातील अडथळाच आहे आणि तोच अडथळा त्यानं जोरदार धडक देत एका झटक्यात दूर केला. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @social_._pulse नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, ज्यावर युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करीत आहेत. एका युजरनं विनोदात म्हटलं, “या धडकेमुळे भावाला दिवसा तारे दिसले असतील.” दुसऱ्यानं लिहिलं, “कोणी रस्त्यावर असं उभं राहतं का?” तिसऱ्यानं लिहिले, “असं दिसतं की हा माणूस आता चार दिवस उठू शकणार नाही.”