मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जबलपूरमध्ये तब्बल ५० प्रवाशांना घेऊन निघालेल्या मेट्रो बसच्या चालकाला अचानक हार्ट अटॅक आला. यानंतर बस अनियंत्रित झाली आणि बसने ऑटो, दुचाकी यांना उडवलं. या संपूर्ण घटनेने परिसर हादरून गेला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये बस ट्राफिक सिग्नलवर गाड्यांना उडवताना आणि लोकांना चिरडताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

.मीडिया रिपोर्ट्सनुसार, जबलपूरमधील एका चौकात शुक्रवारी दुपारी ही दुर्घटना घडली. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आधारताळ येथून शहर बस रनीतालकडे निघाली असताना हा सर्व प्रकार घडला. त्यानंतर बस चालकाला ट्रॅफिक सिग्नलजवळ येताच हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर ही बस माणसांना आणि वाहनांना धडक देत रस्त्याच्या कडेला थांबली. सुरुवातीला लोकांना वाटले की चालक मद्यधुंद आहे. पण जेव्हा चालक बेशुद्धवस्थेत सापडला तेव्हा सगळ्यांना धक्का बसला. यानंतर चालकाला रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले.

( हे ही वाचा: कोकणातल्या रस्त्यावर नक्की चाललंय तरी काय? ड्रायव्हर नसतानाही गोल गोल का फिरतेय ‘ही’ रिक्षा? पाहा Video)

( हे ही वाचा: Video: “चोरी करून भारी वाटले पण…” चोराचे उत्तर ऐकून पोलीसही लागले हसायला अन तितक्यात…)

बस चालकाला सिग्नलजवळ पोहोचताच हृदयविकाराचा झटका आला आणि बस सिग्नलवर थांबली नाही. लोकांना काही समजेल तोपर्यंत समोरील ऑटो, दुचाकी आणि स्कूटी स्वारांना चिरडत बस पुढे सरकली. या अपघातात चालक हरदेव पाल याचा जागीच मृत्यू झाला तर रस्त्यावरील अपघातात जखमी झालेल्या एका वृद्धाचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी दोन मुलांसह अन्य पाच जण जखमी झाले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bus driver dies due to heart attack on road crushed people and vehicle in madhya pradesh gps
First published on: 04-12-2022 at 10:54 IST