लहान कॅफे आणि रेस्टॉरंट मालकांसाठी इंटरनेट हे एक उत्तम वरदान ठरले आहे. सोशल मीडियामुळे, जगभरातील लोक त्यांच्या कॅफे आणि रेस्टॉरंटची माहिती अनेकांपर्यंत सहज पोहचू शकतात. सोशल मीडियावर असे अनेक माहिती देणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात काश्मीरमधील एक सुंदर कॅफे दाखवला जात आहे जो भारतीय सैन्याद्वारे चालवला जात आहे. या कॅफेचा व्हिडीओ बिझनेस टायकून आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केला होता आणि तेव्हापासून तो व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, “माझ्या मते, हा कॅफे ५ स्टार नाही, ७ स्टार नाही तर १० स्टार डेस्टिनेशन आहे. हा व्हिडीओ मुळात गरिमा गोयल नावाच्या ब्लॉगरने तयार केली होती. व्हिडीओमध्ये, ब्लॉगर गरिमा गोयल आपल्याला काश्मीरमधील एका सुंदर कॅफेमध्ये घेऊन जातात. लॉग हट कॅफे म्हणून याची ओळख आहे, हे गुरेझो व्हॅली नावाच्या ठिकाणी टेकड्यांच्या मध्यभागी स्थित आहे. ते ग्राहकांना विविध प्रकारचे स्नॅक्स आणि वेगवेगळी पेये सर्व्ह करतात.

(हे ही वाचा: रस्त्यावर पडून पावसाचा आनंद घेणाऱ्या चिमुकल्याचा video viral; नेटीझन्सकडून मिळतेय पसंती)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओला आधीच ५३५ हजार व्ह्यूज आणि जवळपास २० हजार लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्सही केल्या आहेत.

(हे ही वाचा: भारतातील पहिली खासगी ट्रेन उद्या पोहोचणार शिर्डीला, जाणून घ्या काय आहे तिची खासियत)

(हे ही वाचा: माकडांना फळ खाऊ घालत पोलिसाने जिंकली नेटीझन्सची मनं; व्हिडीओ सोशल मीडियावर viral)

अनेक नेटीझन्सना या ठीकानला भेट द्यायची इच्छा आहे. अनेकजण हा व्हिडीओ पाहून प्रभावित झाले आहेत. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडीओ?

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cafe run by the indian army at kashmir gets 10 star rating from anand mahindra ttg
First published on: 16-06-2022 at 13:19 IST