Indian Railways Liquor Carry Rules: भारतात लांबच्या प्रवासासाठी बस किंवा विमानापेक्षा रेल्वेला प्राधान्य दिले जाते. रोज लाखो प्रवाशी रेल्वेने प्रवास करत असतात. भारतीय रेल्वे देशाच्या सर्व राज्यात अतिशय दुर्गम भागांनाही जोडण्याचे काम करते. प्रवाशांना सुविधा व्हावी, यासाठी रेल्वेकडूनही नवे नव्या योजना आणि नियम तयार केले जात असतात.
रेल्वेतील मद्याचे नियम काय आहेत?
बस किंवा विमानाच्या तुलनेत रेल्वेतून अधिक सामान वाहून नेता येते, त्यामुळेही अनेक प्रवाशी रेल्वेला प्रवासाला पसंती देतात. रेल्वेतून प्रवास करत असताना सामान्य प्रवासी किती प्रमाणात मद्य नेऊ शकतात? असा प्रश्न अनेकदा प्रवाशांकडून विचारला जातो.
रेल्वेतील मद्य वाहतुकीचे नियम
ख्रिसमस आणि वर्षअखेरिच्या सुट्ट्यांसाठी आता रेल्वेची बुकिंग सुरू आहे. तिकिटे मिळावीत म्हणून लोक आतापासूनच बुकिंग करत असतात. अनेकजण आपल्या गावी जात असतात किंवा थंड हवेचे ठिकाण व समुद्रकिनारी सुट्ट्यांचा आनंद घालवण्याचा विचार करतात. सुट्ट्यांसाठी जात असताना किती प्रमामा मद्य नेण्याची परवानगी आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून धावत्या रेल्वेत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मद्य पिण्याची सक्त मनाई आहे.
किती प्रमाणात मद्य नेता येते
द इंडियन एक्सप्रेसशी बोलत असताना एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, रेल्वेमध्ये मद्य घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. ट्रेनमध्ये मद्याची बाटली घेऊन जाण्यावर निर्बंध आहेत.
रेल्वे अधिकाऱ्याने पुढे म्हटले, रेल्वे गाड्यात मद्यपान करून प्रवास केल्यास त्या प्रवाशाच्या सुरक्षेला धोका तर निर्माण होतोच, त्याशिवाय इतर सहप्रवाशांनाही त्याचा त्रास सहन करावा लागू शकतो.
रेल्वेचे बुकिंगचे नवे नियम माहीत आहेत का?
भारतीय रेल्वेने खालच्या बर्थच्या बुकिंगबाबत एक महत्त्वाचा बदल केला आहे. तात्काळ तिकीट बुकिंग आणि आरक्षणाचे नियम बदलल्यानंतर रेल्वेने आता ट्रेनच्या बसण्याच्या पद्धतीबाबत नवीन नियम काढले आहेत.
रेल्वेच्या नियमांनुसार, ४५ वर्षांवरील महिला, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांना लोअर बर्थ दिला जातो. असे असले तरी हे जागांच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. तिकीट बुक करताना तुम्ही लोअर बर्थ सीटचा पर्याय निवडला तरीही ती उपलब्ध नसेल तर तुम्हाला मधली, वरची किंवा बाजूची सीट मिळेल. आता रेल्वेने यामध्ये एक मोठा बदल केला आहे. रेल्वेने तिकीट बुकिंग करताना लोअर बर्थ उपलब्ध असेल तरच बुक करा हा पर्याय सुरू केला आहे. आयआरसीटीसी वरून तिकीट बुक करताना लोअर बर्थ उपलब्ध असेल तरच बुक करा हा पर्याय दिला जातो. याअंतर्गत ट्रेनमध्ये खालचा बर्थ उपलब्ध असेल तरच तुमचे तिकीट बुक केले जाईल.
