Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti Wishes Messages In Marathi:मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची तिथीनुसार आज जयंती आहे. तारखेनुसार दरवर्षी दरवर्षी १४ मे रोजी साजरी जंयती केली जाते. मराठा साम्राज्याचे संभाजी महाराज हे दुसरे छत्रपती होते. १६८१ ते १६८९ या काळात त्यांनी स्वराज्याची धुरा समर्थपणे सांभाळली आणि विस्तार केला. मात्र, फितुरीमुळे संभाजी महाराज हे औरंगजेबाच्या तावडीत सापडले आणि त्यानंतर त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची आठवण आजही प्रत्येक मराठी मनाला व्यथित करते. छत्रपती संभाजी महाराजांच्या(तिथीनुसार) जयंतीनिमित्त तुम्ही तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा संदेश पाठवून अभिवादन करू शकता.
प्रौढ प्रताप पुरंदर,
महापराक्रमी रणधुरंदर क्षत्रियकुलावतंस्, सिंहासनाधीश्वर,
महाराजाधिराज, महाराज श्रीमंत,
श्री छत्रपती संभाजी महाराज की जय!
छत्रपती संभाजी महाराजांना (तिथीनुसार) जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
सिंहाच्या जबड्यात टाकूनी हात
मोजीन दात अशी ही मराठी जात,
छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो!
छत्रपती संभाजी महाराजांना (तिथीनुसार) जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

पाहुनी शौर्य तुझपुढे,
मृत्यूही नतमस्तक झाला,
स्वराज्याच्या मातीसाठी,
माझा शंभू अमर झाला,
छत्रपती संभाजी महाराजांना (तिथीनुसार) जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक,
धर्मनिष्ठा आणि देशभक्तीचे प्रेरणास्थान
अशा छत्रपती संभाजी महाराजांना (तिथीनुसार) जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
मृत्यूलाही मात देईल
असा त्यांचा गनिमी कावा,
झुकले नाही डोळे त्यांचे
असा माझा शिवबाचा छावा
छत्रपती संभाजी महाराजांना (तिथीनुसार) जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

कोंढाण्यासाठी तानाजी गेला
घोडखिंडीसाठी समोर बाजी आला
महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी,
स्वराज्य रक्षक संभाजी झाला
छत्रपती संभाजी महाराजांना (तिथीनुसार) जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
हिमालयाएवढे शौर्य असलेल्या महापराक्रमी, छत्रपती संभाजी महाराजांना (तिथीनुसार) जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर,
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे, राजा संभाजी!
छत्रपती संभाजी महाराजांना (तिथीनुसार) जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
सिंहाची चाल, गरुडाची नजर,
स्रियांचा आदर आणि शत्रूचे मर्दन,
असे असावे मावळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण
छत्रपती संभाजी महाराजांना (तिथीनुसार) जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
जो नीतिमत्ता, सत्य आणि देवासमोर नतमस्तक होतो,
संपूर्ण जग त्याचा आदर करतो
अशा छत्रपती संभाजी महाराजांना (तिथीनुसार) जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
स्वराज्याचा ज्याला लागला हो ध्यास,
रयतेचे रक्षण ही एकच होती मनी आस,
शत्रुलाही वाटत होती ज्यांची भीती,
असे आमचे संभाजी राजे ‘छत्रपती’
छत्रपती संभाजी महाराजांना (तिथीनुसार) जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

शृंगार होता संस्कारांचा,
अंगार होता हिंदवी स्वराज्याचा,
शत्रूही नतमस्तक होई जिथे,
असा पुत्र होता छत्रपती शिवरायांचा
छत्रपती संभाजी महाराजांना (तिथीनुसार) जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
महत प्रतापी शिवरायांचा शूरवीर छावा
वंदन करितो बलिदानाला जय शंभूराया
छत्रपती संभाजी महाराजांना (तिथीनुसार) जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
रुद्राचा अवतार
वाघाचा ठसा होता
अरे, त्या सह्याद्रीला विचारा
माझा शंभूराजा कसा होता!
छत्रपती संभाजी महाराजांना (तिथीनुसार) जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
