Viral video: आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. कोविड-१९ नंतर वाढलेल्या ताणतणावांच्या पार्श्वभूमीवर वाढत्या आत्महत्या हा एक गंभीर सार्वजनिक प्रश्न म्हणून समोर येऊ लागला आहे. काही घटना इतक्या भयानक घडतात की त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी, काय लिहावं किंवा काय सांगावं ते सूचत नाही. अशाच एका महिलेनं पुलावरुन उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र यावेळी एका व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे ती बचावली आहे. या घटनेचा थराकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये एका तरुणीने अर्पा नदीत उडी मारण्याची धमकी देऊन आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. नंतर पुलावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने तिला वाचवले. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे, परंतु असे म्हटले जात आहे की हे तिच्या प्रियकराच्या भांडणातून घडले आहे. नदीत उडी मारण्याचा प्रयत्न करताना कोणीतरी तिचे व्हिडिओ देखील रेकॉर्ड करत होते; त्या फुटेजमध्ये संपूर्ण घटना कैद झाली आहे.

अर्पा नदीच्या पुलाच्या रेलिंगच्या काठावर उभ्या असलेल्या महिलेच्या जवळ जाणाऱ्या व्यक्तीने धाडसाने जाऊन ही धक्कादायक दुर्घटना टळली. त्या व्यक्तीने तिचे दोन्ही हात काळजीपूर्वक धरले आणि तिला पुलाच्या बाजूला ओढले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेबद्दल आणखी कोणतेही वृत्त नाही. सोशल मीडियावरील काही व्हिडिओंमध्ये असा दावा केला आहे की ती महिला तिच्या प्रियकरामुळे प्रेमाच्या रागातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @HarishT82405682 नावाच्या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, बिलासपूरमध्ये अर्पा नदीत उडी मारून एका तरुणीने आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आणि एका वाटसरूने तिला वाचवले. या घटनेवर सोशल मीडिया यूजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले… काय कारण असेल की त्या महिलेला आपला जीव द्यावा असं वाटलं? दुसऱ्या युजरने लिहिले… ते कशा प्रकारचे लोक आहेत, ते मरण्यापूर्वी आपल्या कुटुंबाचा विचारही करत नाहीत. तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले … “ज्याचं दुख: त्यालाचा माहिती”