Viral Video : सध्या सोशल मीडिया हे अनेकांचे एक मनोरंजनाचे साधन बनले आहे. यामुळे टीव्ही, व्हिडीओ गेमऐवजी अनेकांना आता मोबाइलवर रील्स, व्हिडीओ बघून स्वत:चे मनोरंजन करून घ्यायला आवडते. यात अनेक व्हिडीओ किंवा रील्स अशा असतात, ज्या पाहिल्यानंतर आपला वेळ खूप आनंदात जातो. यात विशेषत: लहान मुलांचे व्हिडीओ युजर्सची मनं जिंकतात. कारण लहान मुलं खूप निरागस आणि तितकीच अल्लड असतात, त्यामुळे ते कधी काय करतील याचा नेम नाही. अशा वेळी मोठ्यांची मात्र चांगलीच फजिती होती. सध्या सोशल मीडियावर असाच एका मुस्लीम समाजातील एका कुटुंबाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात एक चिमुकला एका वृद्ध व्यक्तीसोबत असे काही करतो जे पाहून तुम्हीही हसून हसून लोटपोट व्हाल.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका मुस्लीम कुटुंबातील सदस्य एकत्र नमाज पठण करण्यासाठी उभे होते. तेवढ्यात तिथे एक चिमुकला येतो आणि तो समोर उभ्या असलेल्या वृद्धाची लुंगी वर करत आत शिरतो. हे पाहून मागे उभ्या असलेल्या महिला जोरजोरात हसू लागतात. यानंतर वृद्धदेखील हसून खाली बसतो. इतकेच नाही तर तो चिमुकलाही खळखळून हसतो. चिमुकल्याचा हा अल्लडपणा पाहून युजर्सना आता हसू आवरणे कठीण झाले आहे. अनेकांना हा व्हिडीओ फार आवडला आहे.

Viral Video : अवघ्या १० रुपयांत घरच्या घरी तयार केला एसी; तरुणाचा देसी जुगाड पाहून तुम्हीही व्हाल थक्क

इन्स्टाग्रामवर kasaragodpage नावाच्या अकाऊंटवर तो शेअर करण्यात आले आहे . हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. यासोबतच त्यावर लाखो लाइक्सही आले आहेत. हा मनोरंजक व्हिडीओ लोकांना खूप आवडला आहे. यावर अनेकांनी कमेंट्सही केल्या. एकाने कमेंट करत लिहिले की, बालपण हेच असते तर आणखी एकाने लिहिले की, आता पुन्हा नमाज पठण करावे लागेल.