Shocking video: आपल्या चुकांवर पांघरूण घालणारी, आपल्याला उभं राहण्यासाठी बळ देणाऱ्या आईची तुलना कोणासोबतही होऊ शकत नाही. सोशल मीडियावर दररोज आई आणि मुलाच्या नात्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ आपल्या मनात घर करून राहतात, तर काही वेळा अशा घटना समोर येतात की त्यावर विश्वास ठेवणंही कठीण होतं. सध्या अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. आई आपल्या लेकरासाठी खूप काबाडकष्ट करत असते, पण तीच आई मुलाच्या जीवावर उठली तर काय?

सोशल मीडियावर व्हिडीओ आणि रील्स बनवून अनेकांनी आपलं आयुष्य बदललं आहे. आज असे लोक लाखो-कोट्यवधी रुपये कमावत आहेत. पण, व्हिडीओ बनविण्याच्या नादात अनेक जण आपला जीव धोक्यात घालतात. अनेकदा अशा घटना घडल्या आहेत; ज्यात व्हिडीओ बनविताना अनेकांना प्राणसुद्धा गमवावे लागलेले आहेत. रेल्वे रुळांवर, समुद्रात, डोंगरावर, चालत्या ट्रेनमध्ये, चालत्या बाईकवर किंवा कारवर लोक स्टंट व्हिडीओ शूट करताना दिसतात; पण काही वेळा त्याचे त्यांना गंभीर परिणामही भोगावे लागतात. अशाच एका आईनं रिलच्या नादात आपल्या लहान बाळाला मृत्यूच्या दारात पोहोचवलं..याचा थरकाप उडविणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महिला हायवेवर रस्त्याशेजारी रील शूट करत आहे. रील शूट करण्यासाठी तिने जमिनीवर कॅमेरा ठेवलेला होता. यावेळी तिच्या दुसऱ्या हातातही कॅमेरा दिसत आहे. कॅमेरा ठेवून ती डान्स करत होती. यादरम्यान सफेद रंगाचं जॅकेट घातलेली तिची लहान मुलगी हायवेच्या दिशेने जाताना दिसत आहे. याचवेळी काळ्या रंगाचं जॅकेट घातलेला एक मुलगा तिथे येतो आणि तिला मुलगी हायवेकडे जात असल्याचा इशारा करतो. पण यानंतर महिला मुलीकडे लक्ष न देता, मुलालाच कॅमेऱ्यात पाहण्यास सांगते. नंतर जेव्हा ती मागे वळून पाहते तेव्हा मुलगी हायवेच्या दिशेने जात असल्याचं पाहून धाव घेते. आणि नशीब बलवत्तर म्हणून कोणतीही गाडी येऊन चिमकलीला उडवत नाही. ही महिला पळत जाऊन तिला मागे खेचते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> घोरपडीनं ५ सेकंदात गिळली जिवंत बकरी; पोटातून येतोय रडतानाचा आवाज, VIDEO पाहून काळजाचं पाणी होईल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @jitu_rajoriya नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी महिलेवर टीका केली आहे. मुलाच्या आणि स्वतःच्या सुरक्षिततेची खात्री करण्याऐवजी काही सेकंदांच्या लहान रीलला जास्त महत्त्व देणाऱ्या महिलेवर नेटकरी चांगलेच संतापले आहेत. “आजच्या जगात आई होण्यापेक्षा इंटरनेटवर प्रसिद्धी अधिक महत्त्वाची आहे”, “रिल पुन्हा बनवता येईल पण लेकरु गेलं तर पुन्हा येईल का ”, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.