Social Media Viral Video : असं म्हणतात की मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात. लहान मुलं कितीही गोंडस असली तरी त्यांना सांभळणे फार अवघड काम आहे. जरा नजर हटेपर्यंत लहान मुलं काही ना काही गोंधळ घालून ठेवतात आणि तुमचे काम वाढते. कित्येकदा मुलं स्वत:सह दुसऱ्यांनाही संकट ओढतात. अशावेळी पालकांचे लक्ष नसेल त मोठा अनर्थ होऊ शकतो. असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. मुलांवर नेहमी लक्ष ठेवणे ही पालकांची जबाबदारी आहे. थोडासाही निष्काळजीपणा केला तर मोठी दुर्घटना घडते. नुकताच लिफ्टमध्ये एका मुलीसोबत झालेल्या अपघाताचा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता.

माणसाने आपल्या सोयीसाठी अनेक गोष्टी शोधून काढल्या आहेत. सुरुवातीला जागेची कमतरता भरून काढण्यासाठी बहुमजली इमारती बांधल्या गेल्या. त्यानंतर पायऱ्या चढण्याचा त्रास टाळण्यासाठी या इमारतींवर लिफ्ट बसवण्यात आल्या. लिफ्टचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा. सोयीचे असले तरी शेवटी अशी अनेक प्रकरणेही समोर येतात, जी कळल्यानंतर लिफ्टमध्ये जायलाही भीती वाटायला लागते.

लिफ्ट अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लिफ्टमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला आहे. लिफ्टमध्ये एक महिला आपल्या मुलीसोबत दिसत आहे. ही महिला फोनमध्ये बिझी असल्याचे दिसत आहे, याचदरम्यान लिफ्टचा दरवाजा उघडतो आणि चिमुकलीचा हात लिफ्टच्या दरवाजामध्ये अडकतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – कुत्र्यानं वाचवले पोलिसाचे प्राण! हृदयविकाराचा झटका येताच कुत्र्यानं दिला CPR, VIDEO पाहून व्हाल अवाक्

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आई बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती

दारात हात अडकल्याने मुलगी आरडाओरडा करू लागली, तेव्हा ती महिला आपल्या मुलीच्या मदतीसाठी ओरडू लागली.महिला एका हाताने पकडून मुलीचा हात ओढू लागली, मात्र महिलेचे सर्व प्रयत्न फोल ठरले. ही घटना इंडोनेशियातील आहे. व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.