Snake Charmer vs Cobra: साप आणि गारुडी यांचे किस्से आपण नेहमीच ऐकतो. “पुंगी वाजवली की साप बाहेर येतो” असं सर्वांनाच माहीत असतं. पण, जर सांगितलं की पुंगी वाजवल्यावर साप उलट पळून गेला, तर? होय! असाच काहीसा थरारक प्रसंग सोशल मीडियावर व्हिडीओच्या रूपात धुमाकूळ घालत आहे.

एका क्षणी गारुडी पुंगीचा सूर लावतो आणि पेटाऱ्यातून बाहेर डोकावतो कोब्रा. सगळ्यांना वाटतं आता तो नाचणार… पण, पुढच्या क्षणी तो जे करतो ते कदाचित तुम्हीही पहिल्यांदा पाहाल. जिथे साप बाहेर येऊन नाचतो असं आपण नेहमी ऐकलं, तिथे या कोब्राने मात्र काहीतरी असं केलं, ज्यामुळे गारुडी आणि पाहणारे दोघेही थबकून गेले. व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही…

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दिसतं की, एक गारुडी आपल्या समोर पेटारा ठेवतो आणि पुंगी वाजवायला सुरुवात करतो. काही क्षणातच पेटाऱ्यातून किंग कोब्रा बाहेर येतो. पण, अपेक्षेप्रमाणे नाचण्याऐवजी किंवा शांतपणे वळवळण्याऐवजी तो अचानक उलट्या दिशेने वेगाने पळ काढतो.

थरारक दृश्य इथंच संपत नाही. कोब्रा सरपटत जवळच्या नाल्यात घुसतो आणि क्षणात नजरेआड होतो. गारुडी त्याच्या मागे धावतो, पण कितीही प्रयत्न केला तरी त्या अजस्त्र सर्पाला पकडण्यात तो पूर्णपणे अपयशी ठरतो.

हा भन्नाट व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @palsjat2024 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. पाहता पाहता तो लाखोंपर्यंत पोहोचला. आतापर्यंत या व्हिडीओला ३ लाखांहून अधिक views मिळाले आहेत आणि ७ हजारांपेक्षा जास्त लोकांनी तो लाईक केला आहे.

लोक मात्र हा व्हिडीओ पाहून मजेशीर कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिलं, “पुंगी वाजवली की साप बाहेर येतो हे ऐकलं होतं; पण पुंगी वाजवताच पळून जातो हे पहिल्यांदाच बघितलं!” दुसरा म्हणाला, “हा गारुडी गावकऱ्यांसाठी खरी आफत घेऊन आला.” तर तिसऱ्याने हसत लिहिलं, “काय गारुडी आहेस रे? साप तर तुला चकवून पळून गेला.”

सोशल मीडियावर दररोज सापांचे थरारक व्हिडीओ व्हायरल होत असतात. किंग कोब्रा, अजगर आणि अगदी ॲनाकोंडाही या यादीतून सुटलेले नाहीत. पण, हा व्हिडीओ मात्र वेगळाच आहे, कारण यात सापाने दाखवलेली अनपेक्षित चपळाई लोकांना थक्क करून गेली आहे.

येथे पाहा व्हिडीओ

तुम्हीही जर हा VIDEO पाहिला नाही तर विश्वास बसणार नाही की कोब्रा असा थेट पळ काढू शकतो.