scorecardresearch

नागाने फणा काढताच मुंगूसाची झाली हवा टाईट; Video पाहून तुमचाही थरकाप उडेल

नाग आणि मुंगूसाचा थरारक व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

Cobra Tries To Bite Mongoose Video
कोब्रा आणि मुंगूसाचा व्हिडीओ व्हायरल झाला. (Image-Instagram)

Cobra Vs Mongoose Viral Video : सर्वात विषारी सापांपैकी एक म्हणजे नाग साप. नागासोबत पंगा घेणे माणसांच्याही जीवावर बेतल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. नागाने फणा काढला की भल्या भल्यांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. एका मुंगूसानेही नागाशी पंगा घेतल्याचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. मुंगूस नागासमोर गेल्यावर दोघांमध्ये जोरदार फाईट झाल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. मुंगूसाने नागावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा नागानेही पलटवार करुन मुंगूसाची हवा टाईट केली. हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एक मुंगूस नागाच्या जवळ जाऊन त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. पण मुंगूसाला पाहिल्यावर नागही पिसाळतो आणि त्याला दंश करण्याचा प्रयत्न करतो. नाग आणि मुंगुसाचा रंगलेला हा थरार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. नागाने फणा काढताच मुंगूस चार हात लांब झाल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. नागाच्या दंशपासून वाचवण्यासाठी मुंगुस दोन पाऊल मागे टाकतो. पण पुन्हा तो नागावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. नागाने मुंगूसाला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुंगूसाने नागाला घाबरुन पळ काढला. त्यानंतर नागही मुंगुसावर हल्ला करणे थांबवतो आणि त्याठिकाणाहून निघून जाण्याचा प्रयत्न करतो.

नक्की वाचा – अखेर त्या दोन चित्त्यांना जंगलात सोडलं, पिंजऱ्याचा दरवाजा उघडताच ठोकली धूम अन् घडलं…Video पाहून थक्क व्हाल

इथे पाहा व्हिडीओ

सर्पदंशामुळे अनेक माणसांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. नागासोबत खेळ करुन रील किंवा व्हिडीओ बनवून इंटरनेटवर व्हायरल करण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पण यावेळी नाग आणि मुंगूस यांच्यात रंगलेला थरार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ @alzemitsrt नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला २२ हजरांहून अधिक लाईक्स मिळाले असून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. साप आणि मुंगूसाचा व्हिडीओ पाहून अनेकांचा थरकाप उडाल असेल, कारण पिसाळलेल्या नागाने फणा काढून मुंगूसावर हल्ला करण्याचा अनेकदा प्रयत्न केल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-03-2023 at 19:02 IST