scorecardresearch

अखेर त्या दोन चित्त्यांना जंगलात सोडलं, पिंजऱ्याचा दरवाजा उघडताच ठोकली धूम अन् घडलं…Video पाहून थक्क व्हाल

पिंजऱ्यात जेरबंद असलेल्या चित्त्यांना जेव्हा जंगलात सोडलं, तेव्हा काय घडलं? पाहा थरारक व्हिडीओ.

Cheetah and Other Animals Released Video
जंगलातील खतरनाक प्राण्यांचा व्हिडीओ व्हायरल. (Image-Twitter)

Wild Animals Viral Video : माणसाला जसं जगण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे, तसंच प्राण्यांनाही स्वतंत्रपणे जंगलता फिरण्याचा अधिकार आहे. पण काही माणसं प्राण्यांसोबत खेळ करण्यासाठी त्यांच्या पिंजऱ्यात कोंडून ठेवतात. माणसांच्या अशा कृत्यामुळं प्राण्यांच्या आयुष्य एका बंद खोलीच्या अंधारात दिपून जातं. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे, जर प्राण्यांना पिंजऱ्यातून मुक्त केलं, तर त्यांच्या आयुष्याच्या प्रवासात सुंदर जीवन जगण्याचा आशेचा किरण येईल. अशाच प्रकारचा प्राण्यांचा एक सुंदर व्हिडीओ आएफएस अधिकारी प्रविण कासवान यांनी ट्वीटरवर शेअर केला आहे.

पिंजऱ्यात दोन चित्त्यांना जेरबंद केलेलं असतं. पण जंगलाच्या वाटेवर जेव्हा पिंजऱ्याचा दरवाजा उघडला, तेव्हा मात्र या चित्त्यांनी जंगलात धूम ठोकल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. दुसऱ्या एका पिंजऱ्यात असलेलं माकडं जेव्हा मोकळ्या हवेत बाहेर जातं, त्यावेळी त्याला झालेला मनस्वी आनंद पाहण्यासारखा आहे. माणसांसोबत नेहमीच मैत्रीचे धागेदोरे बांधणारा गोरीलाही जेव्हा पिंजऱ्यातून बाहेर पडतो, तेव्हाच त्याने सुटकेचा निश्वास सोडला, असं व्हिडीओ पाहिल्यानंतर नक्की म्हणता येईल. जंगलातील सुंदर प्राण्यांना पिंजऱ्यात कोंडून ठेवल्यानंतर काय वेदना होत असतील, याचा जराही अंदाज लावता येणार नाही. पण हेच प्राणी पिंजऱ्यातून मुक्त झाल्यावर किती आनंदाने जगतात, हे व्हिडीओ पाहिल्यानंतर नक्कीच म्हणता येईल.

नक्की वाचा – वाघाने काटकोनात नेम धरला अन् क्षणातच हरणाचा गेम झाला? थरारक Video पाहून धडकी भरेल

इथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी सुंदर प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. १३ लाखांहून अधिक व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. तर २४ हजार नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. तसंच ३९०० जणांनी हा व्हिडीओ रिट्वीटही केला आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, हा व्हिडीओ शेअर केल्याबद्दल प्रविण सरांचे मी आभार मानतो. प्राण्यांचा हा सुंदर व्हिडीओ पाहून नक्कीच प्रेरणा मिळेल. प्राण्यांना स्वातंत्र्य मिळणे खूप गरजेचे आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-03-2023 at 11:43 IST
ताज्या बातम्या