Students Dance Video Viral: सोशल मीडियावर दरदिवशी गमतीशीर तसेच शानदार व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके भन्नाट असतात की ते सतत पाहण्याची इच्छा होते. सोशल मीडियावर अनेक डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. पुन्हा एकदा सोशल मीडियावर “पुष्पा २: द रूल”ने आग लावली आहे. मात्र, यावेळी अल्लू अर्जुन नव्हे, तर एका कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा डान्स चर्चेचा विषय ठरतोय. अनेक महाविद्यालयांत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यादरम्यान विद्यार्थी नाटक, डान्स सादर करतात. यातच आता बेंगळुरूमधील विद्यार्थ्यांच्या एका जबरदस्त परफॉर्मन्सने नेटकऱ्यांच्या काळजाचा ठाव घेतलाय. “अंगारों का अंबर सा…” या धमाकेदार गाण्यावर केलेला त्यांचा नृत्याविष्कार इतका दिलखेचक आहे की लोक तो एकदा नव्हे, तर अनेक वेळा पाहतायत.
या व्हिडीओची सुरुवातच इतकी मोहक आहे की नजरा हटत नाही. विद्यार्थिनींनी रंगीबेरंगी साड्यांमध्ये सुरेख सुरुवात केली आणि नंतर विद्यार्थ्यांनी जरा ‘स्वॅग’ने एंट्री घेतली. जोडीने ताल धरत त्यांनी जे नृत्य सादर केलं, ते पाहून क्षणभर तुम्हाला वाटेल की, हे कुठल्यातरी प्रोफेशनल कोरिओग्राफरचं काम असावं.
या ग्रुपनं फक्त डान्स केला नाही, तर अशा पद्धतीनं लय, स्टाइल आणि समोरच्यांशी समन्वय साधत ‘अंगारों’ या गाण्याच्या अग्नीला नवा भडका दिला. सुरुवातीला स्टेजवर अवतरलेली मुलींची मोहक एंट्री, त्यानंतर त्यांच्या जोडीदारांची सळसळती एंट्री आणि मग लयबद्ध अदांनी रंगवलेला परफॉर्मन्स हे सगळं इतकं मंत्रमुग्ध करणारं आहे की एकदा पाहिल्यावर परत न पाहता राहवत नाही.
इन्स्टाग्रामवर @lekhna_l या युजरने व्हिडीओ शेअर केला असून, व्हिडीओ पोस्ट होताच अल्पावधीतच त्याला लाखो लाइक्स आणि शेअर्स मिळाले. या भन्नाट व्हिडीओला आतापर्यंत ७८ लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. कमेंट्समध्ये युजर्सनी कौतुकाचा वर्षाव केलाय. कुणीतरी लिहिलंय, “त्यांनी शॉल कशी साडीशी मॅच केली आहे, अप्रतिम!” तर व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. मुळात या ग्रुपचा याआधी ‘रांझणा’ चित्रपटाच्या टायटल ट्रॅकवरचा एक डान्स व्हिडीओदेखील खूप व्हायरल झाला होता.
येथे पाहा व्हिडीओ
हा परफॉर्मन्स म्हणजे केवळ डान्स नव्हता, तर एक अनुभूती होती. इंटरनेटवर लोकांनी ही मॅजिक मोमेंट शेअर करत सांगितलं, “हा व्हिडीओ पाहून चेहऱ्यावर हसू आलंच पाहिजे!”
तर तुम्ही पाहिला का हा व्हिडीओ? नाही पाहिला, तर एकदा नक्की बघा…