सोशल मीडियावर जुगाड करून तयार केलेल्या वाहनांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात दरम्यान, मुंबईतील वरळी परिसरात एका नवीन प्रकाराच्या वाहनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अमित भवानी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ट्रॅफिक सिग्नलला एक तीन चाकी गाडी थांबलेली दिसली. ती इतर सामान्य वाहनांसारखी दिसत नव्हती,हे कार, बाईक किंवा रिक्षा यांची हटके कॉम्बिनेशन असलेले वाहन होते. हे वाहन भविष्यातून आल्यासारखे दिसत होते. याला नेटकरी ‘बॅटमोबाईल’ असे म्हणत आहे. ‘बॅटमोबाईल’ (Batmobile) ही सुपरहिरो बॅटमॅनने चालवलेली काल्पनिक कार आहे.

कॅप्शननुसार, कारला Lynx Lean Electric असे म्हणतात आणि ती डेन्मार्कमधील Lynx Cars नावाच्या कंपनीने बनवली आहे. यात छान डिझाइन आणि काही स्मार्ट वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे ती खरोखर वेगळी बनते. आपल्याकडे अजूनही उडत्या कार्स नसल्या तरी भविष्यात त्या आपल्याला नक्की पाहायला मिळतील पण सध्या ही तीनचाकी कार अजूनही खूपच आश्चर्यकारक आहे. ही कार लोक वळून पाहतात आणि “व्वा” असे म्हणतात.

हेही वाचा – रामभक्ताने नखावर रेखाटले राम मंदिर; मायक्रो आर्टिस्टच्या कलाकृतीचा Video Viral

व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मुंबईत चालणाऱ्या वाहनांबद्दल लोक अंदाज लावत आहेत. “हे Lynx Cars या डॅनिश कंपनीचे Lynx Lean Electric नावाचे दोन आसनी, तीन चाकांचे टिल्टिंग वाहन आहे. कारची किंमत ३५,००० युरो किंवा ३१,००,००० रुपये आणि आयात खर्च मिळून आहे. “

हेही वाचा – “एकही तो राम हैं किस किस के घर जाएंगे?” पायलटच्या कवितेने जिंकले रामभक्तांचे मन; पाहा Viral Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या कारचा व्हिडिओ ऑनलाइन खूप लोकप्रिय झाला आहे. फक्त एका दिवसात, १४१ हजार पेक्षा जास्त लोकांनी ते पाहिले. प्रत्येकाला या सुंदर कारबद्दल अधिक जाणून घ्यायचे होते आणि त्यांनी याबद्दल ऑनलाइन खूप चर्चा केली. इंटरनेटवर एकाने ही कार कोणती आहे हे शोधून काढले आणि कमेंट करत सांगितले की, “ती कार्व्हर आहे.”