तुम्हाला जर कधी समोर वाघ दिसला तर तुम्ही काय कराल? अर्थात त्या जागेवरून लगेच पळ काढण्याचा प्रयत्न कराल. किंवा जर तिथून निघून जाणे शक्य नसेल तर वाघ जाण्याची वाट बघत स्तब्ध उभे राहाल आणि वाघाने हल्ला करू नये यासाठी प्रार्थना कराल. वाघाला सामोरे जाण्याचे धाडस कोणीच करणार नाही, पण सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये काही जणांनी हे धाडस करत चक्क वाघाबरोबर फोटो काढण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.

आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. मध्य प्रदेशमधील ‘पन्ना व्याघ्र प्रकल्प’ येथे ही घटना घडली आहे. याठिकाणी आलेल्या काही जणांना तिथल्या वाघोबाचे दर्शन झाले. लांब दिसणाऱ्या वाघाबरोबर फोटो काढण्याचा मोह न आवरल्याने या व्यक्तींनी थेट रस्त्यावर उतरत वाघाच्या जवळ जात, त्याच्याबरोबर फोटो काढण्याचा प्रयत्न केला. स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालून फोटो, व्हिडीओ काढण्याच्या या कृतीचा नेटकऱ्यांनी निषेध नोंदवला.

आणखी वाचा : मालकाच्या पायाचा फ्रॅक्चर पाहून कुत्र्याने केले असे काही की…; व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा पाहाच

सुशांत नंदा यांनी शेअर केलेला व्हिडीओ :

या व्हिडीओ शेअर करत सुशांत नंदा यांनी ‘वन्य प्राण्यांना घाबरवु नका, यामुळे ते तुमच्यावर जीवघेणा हल्ला करू शकतात’, असा सल्ला दिला आहे. या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तींवर सुदैवाने वाघाने हल्ला केला नाही. पण अशा प्रकारे वन्य प्राण्यांना घाबरवून, हल्ला करण्यास भाग पाडणे चुकीचे आहे अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया :

Viral Video : रावणाच्या पुतळ्यातून अचानक येऊ लागले अग्निबाण; जीव वाचवण्यासाठी लोकांनी काय केले पाहा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.