केंद्रातील सत्तेपासून सलग आठ वर्षे दूर राहिल्यानंतर काँग्रेसला आता राजकीय मैदान मजबूत करायचे असेल, तर रस्त्यावर उतरावे लागेल, याची जाणीव झाली आहे. त्यामुळे पक्ष ७ सप्टेंबरपासून ‘भारत जोडो यात्रे’वर आहे. काँग्रेस याला व्यापक जनसंपर्क अभियान म्हणत आहे. हा प्रवास एकूण ३५७० किलोमीटरचा आहे. यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची वेगळी शैली पाहायला मिळाली. कुर्ता पायजमा मध्ये दिसणारे राहुल त्या ऐवजी टी-शर्ट आणि पँटमध्ये दिसले. पण लोकांचं लक्ष त्यांच्या बुटांकडे होतं. त्यानंतर सगळ्यांना बुटांची किंमत कळू लागली. आता भाजपाने त्यांच्या टी-शर्टची किंमत सांगून नवा वाद सुरू केला आहे.

भाजपाने आपल्या ट्विटर हँडलवरून राहुल गांधींचा टी-शर्ट परिधान केलेला एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये माजी काँग्रेस अध्यक्षांनी घातलेल्या टी-शर्टची किंमत कोणत्या कंपनीची आहे, हे सांगण्यात आले आहे. पोस्टनुसार, राहुल गांधी यांनी ब्रिटिश लक्झरी फॅशन ब्रँड बर्बेरीचा पोलो टी-शर्ट घातला आहे, ज्याची किंमत ४१ हजार २५७ रुपये आहे. यासोबतच भाजपाने टोमणा मारत लिहिलं आहे की, भारताकडे बघा! आता या पोस्टवरून नवा वाद सुरू झाला आहे.

( हे ही वाचा: ‘भाबीजी घर पर हैं’ फेम सौम्या टंडनची दीपेश भानच्या कुटुंबाला मदत; फेडलं ५० लाखांचं कर्ज)

४१ हजारांचे टी-शर्ट?

( हे ही वाचा: ‘मेकअप आर्ट’ ची ही NEXT LEVEL पाहिलीत का? नसेल तर हा व्हिडीओ एकदा पहाच; डोळे नक्कीच चक्रावून जातील)

लोकांच्या प्रतिक्रिया

( हे ही वाचा: डोक्यावर पदर सांभाळत महिला खेळल्या हॉकी; त्यांची जिद्द पाहून नेटकऱ्यांनी केला सलाम)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशाप्रकारे अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.