बदलत्या काळानुसार विवाहाची पद्धत देखील बदलली आहे. सध्या एक नवा ट्रेंड आलाय. तो म्हणजे प्री-वेडिंग फोटोशूट…यासाठी नवं जोडपं भरमसाठ खर्च देखील करायला मागे पुढे पाहत नाहीत. हे फोटोशूट करण्यासाठी काहीतरी हटके करण्याच्या नादात काही कपल कधी नदीकाठी तर कधी डोंगरदऱ्यांमध्ये जात असतात. काही तरी हटके प्री-वेडिंग करण्याच्या नादात नवरी-नवरीची चांगलीच फजिती झाली. प्री-वेडिंग फोटोशूटच्या नादात हे नवरा नवरी वाहत्या पाण्यात चांगलेच फसले. जवळपास तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर या कपलला वाहत्या पाण्यातून बाहेर काढण्यात आलं. फोटोशूट करता करता फजिती उडाल्यावर नवरी आणि नवरदेवाने दिलेले एक्स्प्रेशन हे पाहण्यासारखे आहेत. एकदा हा व्हिडीओ नक्की पाहाच.

ही घटना राजस्थानमधल्या चित्तौडगढच्या रावतभाटा भागातील आहे. हे कपल मंगळवारी राणा सागर बांध धरणाजवळच्या चुलिया फॉल्स इथल्या धबधब्याच्या ठिकाणी प्री-वेडिंग करण्यासाठी आले होते. प्री-वेडिंग फोटोशूट करताना नवरी-नवरदेव अतिशय खूश होते. पण त्यांच्यासोबत पुढे काय होणार आहे, याची त्यांना पुसटशी कल्पना देखील नव्हती. प्री-वेडिंग करताना नवरा-नवरीसोबत एक विचित्र घटना घडली आहे. ज्या खडकावर बसून हे नवरी-नवरदेव फोटोशूट करत होते, अचानक त्या खडकाला पाण्याने वेढलं. फोटोशूटच्या मूडमध्ये असलेल्या या नवरी-नवरदेवाला मोठा झटका मिळाला.

आपल्याभोवती जिकडे तिकडे वाहत्या पाण्याचा वेढा आणि मध्येच खडकावर नवरा नवरी सोबत आणखी दोन जण अडकले. या प्रसंगाची साधी कल्पना जरी केली तरी हसू आवरता येत नाही. नवरा नवरीच्या फोटोशूटसाठी त्यांच्यासोबत नवरदेवाचा मित्र आणि नवरीची बहीण सुद्धा अडकले. यात फोटोग्राफरने कशीबशी स्वतःची सुटका करत वेढलेल्या पाण्याबाहेर पडला. पण नवरा-नवरी आणि त्यांच्यासोबत आलेले आणखी दोन जण पाण्यातच अडकून राहीले होते.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : आजींनी पहिल्यांदाच पिझ्झा टेस्ट केला, चेहऱ्यावरचे हावभाव पाहून तुम्ही पोट धरून हसाल…

बरं, जीवात जीव तेव्हा आला जेव्हा या लोकांनी पोलिसांना बोलावलं. बराच वेळ प्रतिक्षा करूनही वाहतं पाणी कमी होण्याचं नाव घेत नाही, हे पाहिल्यानंतर तिथल्या लोकांनी पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर तिथए रेस्क्यू टीम घटनास्थळी रवाना झाली आणि तब्बल ३ तासांच्या अथक परिश्रमानंतर सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. यात फोटोग्राफरचा कॅमेरा मात्र पाण्यात वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे.

आणखी वाचा : PHOTOS : सर्वात मोठी मिशीवाला कोण आहे? दाढी-मिशीच्या या अनोख्या स्पर्धेचे PHOTO VIRAL

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिळालेल्या माहितीनुसार, नवरदेवाचं नाव आशीष गुप्ता असून तो कोटा इथला राहणारा आहे. तर नवरीचं नाव शिखा आहे. त्यांचा सोबत नवरदेवाचा मित्र हिमांशु आणि नवरीची भाची मिलन असं नाव आहे. ज्यावेळी फोटोशूट सुरू होतं त्याचवेळी राणा प्रताप सागर धरणातील पाण्याची पातळी वाढल्याने पाण्याचे दरवाजे उघडण्यात आले होते. सायरनही वाजवण्यात आला आणि यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका कर्मचाऱ्याने त्यांना आत जाण्यापासून रोखले सुद्धा होते. मात्र या नवरा-नवरीने ऐकलं नाही, त्यामुळे हा प्रकार घडला. मात्र, चौघांची सुखरूप सुटका करण्यात आली, ही दिलासादायक बाब होती. येत्या १ डिसेंबरला हे नवरा नवरी लग्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.