साप, अजगर, नाग म्हटलं तरी अंगावर काटा उभा राहतो आणि प्रत्यक्षात पाहिल्यानंतर काळजाचा थरकाप उडतो. तुम्ही कधी सापाला हातात घेण्याची कल्पनाही करू शकत नाही पण एका माणसाने मोठे धाडस केले आहे. छोटा-मोठा साप नव्हे तर थेट मोठा किंग कोब्रा त्याने चक्क हातात पकडला आहे. हे दृश्य पाहून अनेकांच्या काळजात धस्स होत आहे पण त्या तरुणाच्या चेहऱ्यावर कसलीच भीती दिसत आहे. विशेष म्हणजे किंग कोब्रा देखील शांत असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
साप चावल्यानंतर वेळीच उपचार न केल्यास एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. दरवर्षी सर्पदंशामुळे हजारो लोकांचे मृत्यू होतात ग्रामीण किंवा जंगली भागात किंवा त्याच्या जवळ राहणार्या अनेकांना विषारी साप चावण्याचा जास्त धोका असतो. ग्रामीण भागासह शहरामध्ये अनेकदा साप आढळतात. पावसाळा सुरू झाल्यापासून हेल्मेटमध्ये, गाडीच्या डिक्कीमध्ये, शूजमध्ये साप आढळल्याचे अनेक व्हिडीओ समोर येत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशात एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून काळजाचा थरकाप उडत आहे.
किंग कोब्राला हातात पकडून फोटो काढतोय माणूस
भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी परवीन कासवान यांनी X वर एका पोस्टमध्ये अकरा सेकंदांची ही क्लिप शेअर केली आहे जिथे प्रेक्षकांना सापाचा आकार आणि त्या माणसाचा निर्भय संयम पाहून आश्चर्य व्यक्त केले
जंगलातील मनोरंजक माहिती शेअर करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कासवानने व्हिडिओसोबत एक कॅप्शन लिहिले आहे: “जर तुम्हाला कधी किंग कोब्राच्या खऱ्या आकाराबद्दल विचार केला आहे का? तुम्हाला माहिती आहे का, तो भारतात कुठे आढळतो. आणि जेव्हा तुम्हाला तो दिसतो तेव्हा काय करावे.”
फुटेजमध्ये नेमके ठिकाण नमूद केलेले नसले तरी, किंग कोब्रा सामान्यतः पश्चिम घाट, ईशान्य आणि ओडिशाच्या काही भागांच्या जंगलात आढळतात. जगातील सर्वात लांब विषारी साप म्हणून ओळखला जाणारा किंग कोब्रा १८ फूट लांबीपर्यंत वाढू शकतो आणि हत्तीला मारण्यासाठी पुरेसे न्यूरोटॉक्सिक विष तयार करतो.
या आठवड्याच्या सुरुवातीला, केरळच्या एका महिला वन अधिकाऱ्याने तिरुवनंतपुरममधील पेप्पाराजवळील ओढ्यातून एका प्रचंड किंग कोब्राला वाचवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.