scorecardresearch

Viral Video : गाय आणि वासराने पाणीपुरीवर मारला ताव; नेटकरी म्हणतात, “यांनी तर मुलींनाही…”

आता माणसंच नाही, तर प्राण्यांनाही या चटपटीत आणि चविष्ट पदार्थांची चटक लागली आहे. तुम्हाला खोटं वाटतंय? तर हा व्हिडीओ पाहाच.

Viral Video : गाय आणि वासराने पाणीपुरीवर मारला ताव; नेटकरी म्हणतात, “यांनी तर मुलींनाही…”
आता माणसंच नाही, तर प्राण्यांनाही या चटपटीत आणि चविष्ट पदार्थांची चटक लागली आहे. (Twitter)

आपण सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ पाहत असतो. त्यातील काही व्हिडीओ तर खूपच मजेशीर असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं शक्य होणार नाही.

चाट पदार्थ सगळ्यांनाच आवडतात. शेवपुरी, पाणीपुरी, भेळ यासारखे चटपटीत पदार्थ आपण कधीही खाऊ शकतो. अनेकांना तर हे पदार्थ इतके आवडतात की हे पदार्थ त्यांचं एका वेळेचं जेवणच असतं. मात्र आता माणसंच नाही, तर प्राण्यांनाही या चटपटीत आणि चविष्ट पदार्थांची चटक लागली आहे. तुम्हाला खोटं वाटतंय? तर हा व्हिडीओ पाहाच.

Viral : पत्नीच्या सांगण्यावरून किराणा भरायला गेला पण एका झटक्यात बनला करोडपती; पाहा नेमकं काय झालं

उत्तरप्रदेशातील लखनऊ या शहरातील एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. गाय आणि तिच्या वासाराचा हा व्हिडीओ खूपच गोड आहे. या दोघांना पाणीपुरी इतकी आवडते की ते एका पाणीपुरी विक्रेत्यासमोर उभे राहिले आहेत आणि एक इसम त्यांना एक-एक करून पाणीपुरी भरवत आहे.

Gale Done! गेलने पुन्हा मैदान गाजवलं पण क्रिकेटचं नाही, तर गरब्याचं; हा भन्नाट Video नक्की पाहा

हा व्हिडीओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की पाणीपुरी हा असा एक पदार्थ आहे जो केवळ माणसांनाच नाही तर प्राण्यांनाही अतिशय प्रिय आहे. ही गाय आणि तिचं वासरू अगदी चव घेऊन पाणीपुरी खात आहेत. केवळ ४० सेकंदाचा हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला असून ते त्यावर मजेशीर कमेंट्सही करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या