Crab Smoking Video Viral : वन्यप्राण्यांसंबंधी अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे फारच भीतीदायक आणि धडकी भरवणारे असतात, काही व्हिडीओ पाहून पोट धरून हसायला येतं. लोकांनाही प्राण्यांच्या जीवनासंबंधित हे व्हिडीओ पाहायला आवडतात. या व्हिडीओमध्ये विशेषत: प्राण्यांच्या लढाईचे आणि शिकारीचे व्हिडीओ अधिक असतात. यात काही व्हिडीओ असे असतात जे पाहताना स्वत:चाच स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात एक खेकडा चक्क सिगारेट ओढताना दिसतोय. जो पाहून युजर्स तुला कसलं रे टेन्शन असा मजेशीर सवाल करताना दिसतायत.
एखाद्याला सिगारेटची सवय लागली की ती सहजासहजी सुटत नाही, पण खेकड्यालाही ही सवय लागू शकते याचा कधी कोणी विचारही केला नसेल. त्यामुळे सिगारेट ओढणाऱ्या खेकड्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, एक खेकड्याने दोन डेंगेमध्ये सिगारेट पकडली आहे. नुसतीच त्याने सिगारेट पकडली नाही तर चालता चालता तो आरामात ओढतानाही दिसतोय. पुढच्या क्षणी खेकडा तुरुतुरु वेगाने पळू लागतो पण डेंगेत पकडलेली सिगारेट काय सोडत नाही. सिगारेट पेटलेला असल्याने खेकडा त्यातून मस्त धूर सोडत मजा लुटतोय. हे दृश्य राहून युजर्सना धक्का बसला आहे, कारण एखादा खेडका कसं काय अशाप्रकारे सिगारेट ओढू शकतो असा प्रश्न त्यांना पडलाय.
सिगारेट ओढणाऱ्या खेकड्याचा हा व्हिडिओ @sunnykathuria.yt नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. जो आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आणि त्यावर हजारोंनी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, “सिगारेटची पॉवर पाहा” दुसऱ्याने युजरने लिहिले की, “खेकड्याचं ब्रेकअप झालं वाटत”. तिसऱ्याने लिहिले की, “खेकडा पण डिप्रेशनमध्ये आहे वाटतं.”