Viral Cricket Video: क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ, असा का म्हटलं जातं. कारण- या खेळात काहीही निश्चित नसतं. कधीही काहीही होऊ शकतं. आता याचं उत्तम उदाहरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक भन्नाट व्हिडीओ देतोय. या व्हिडीओमध्ये घडलेला एक प्रसंग इतका विचित्र आणि गोंधळात टाकणारा आहे की, क्रिकेटप्रेमींना प्रश्न पडतोय, “फलंदाज खरंच आऊट आहे की नॉट आऊट?”

क्रिकेटमध्ये आपल्याला तुम्ही बॉल, बॅट व स्टम्प्स यांच्या साह्यानं खेळल्या जाणाऱ्या चित्तथरारक खेळाचा मनमुराद आनंद लुटता येतो. पण, तुम्ही कधी एखाद्या टोपीमुळे विकेट पडताना पाहिलंय? होय! सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक विचित्र व्हिडीओ क्रिकेटच्या नियमांवरच प्रश्नचिन्ह उभं करतोय. बॅटनं मारली टोपी, टोपीनं उडवला स्टम्प… आणि मैदानावर गोंधळाची लाट. पण, अशा प्रसंगात फलंदाज आऊट मानावा का? चला, पाहूया हा व्हिडीओ आणि समजून घेऊ नियमांची खरी बाजू.

व्हिडीओमध्ये काय घडलं?

या व्हायरल व्हिडीओमध्ये एका स्थानिक क्रिकेट सामन्यातील प्रसंग समोर दिसतो. एक फलंदाज वेगवान गोलंदाजाचा चेंडू खेळतो; पण चेंडू त्याच्या बॅटला लागत नाही. त्यामुळे चिडलेला फलंदाज स्वतःच्या हेल्मेटवर बॅट मारतो आणि नेमका इथेच सगळा सस्पेन्स सुरू होतो. फलंदाजाच्या डोक्यावरील टोपी (कॅप) हवेत उडते आणि थेट स्टम्पवर येऊन आदळते. गोलंदाज ताबडतोब ‘आऊट’साठी अपील करतो. मैदानातले सगळे काही क्षणांसाठी हादरतात.

पण, प्रश्न हा की, फक्त टोपी स्टम्पवर पडल्यामुळे फलंदाज आऊट ठरेल का?

या घटनेनं प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच ताणली आहे. पंचानं काय निर्णय दिला, हे व्हिडीओमध्ये दिसत नाही. मात्र, सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी याबाबत जोरदार चर्चा सुरू केली आहे. अनेकांनी त्याबाबत आपले मत व्यक्त केले; पण अजूनही बरेच जण संभ्रमातच दिसत आहेत.

शेवटी काय म्हणतो क्रिकेटचा नियम?

या प्रश्नाचं उत्तर मागितलं गेलं AI तज्ज्ञ @Grok कडून. त्यानं स्पष्ट सांगितलं – “MCC नियम ३५ नुसार, फलंदाज ‘हिट विकेट’ आऊट ठरेल.” या नियमानुसार जर फलंदाजाची बॅट, कपडे किंवा इतर कोणताही भाग विकेटला लागतो आणि बेल वा बेल्स पडतात, तेव्हा तो आऊट ठरतो. टोपी जरी स्वतः हातानं टाकली नसेल, तरी ती फलंदाजामुळेच पडली असेल, तर हा नियम लागू होतो. अशा प्रकारचं प्रकरण १९६१ मध्येही घडलं होतं, जेव्हा जो सोलोमन यांना अशाच घटनेत आऊट दिलं गेलं होतं.

या व्हिडीओनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. Twitter (X) वरील @TazaTamacha या हँडलवरून शेअर झालेला हा व्हिडीओ सहा लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून, हजारो लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा व्हिडीओ

तर तुम्हाला काय वाटतं ही हिट विकेट होती का निव्वळ एक अपघात? एकदा व्हिडीओ पाहाच आणि स्वतः निर्णय घ्या.