Sachin Tendulkar Enjoys Snowfall In Kashmir : भारतीय क्रिकेट संघाचा हुकमी खेळाडू अन् मास्टर ब्लास्टर सध्या आपल्या कुटुंबासह सुटीचा आनंद घेत आहे. काही दिवसांपूर्वी सचिनने आग्रा गाठून चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. या आग्रा भेटीनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सध्या काश्मीरमध्ये तेथील निसर्गसौंदर्याचा आणि बर्फवृष्टीचा आनंद लुटताना दिसत आहे. खुद्द सचिनने याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सचिन तेंडुलकरने इन्स्टाग्रामवर याबाबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये सचिन तेंडुलकर विमानातील विंडो सीटवर बसला आहे. तो विमानाच्या खिडकीतून दिसणाऱ्या बर्फाची चादर पांघरलेल्या सुंदर पर्वतरांगा दाखवीत आहे. यावेळी त्याने चाहत्यांना अंदाजे सांगा हे ठिकाण कुठे आहे, असा प्रश्न विचारला. त्यानंतर तो कारमध्ये बसून काश्मीरच्या रस्त्यावरून प्रवास करताना सुंदर दृश्यांचा आनंद घेताना दिसत आहे.

What Samantha Said?
‘निरागस पतीला का फसवलंस?’, ट्रोलरच्या प्रश्नावर समांथाचं रोखठोक उत्तर, म्हणाली..
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?
Raghuram Rajan on PM narendra modi
‘मोदींचे २०४७ च्या विकसित भारताचे ध्येय मूर्खपणाचे’, रघुराम राजन यांची टीका
Even today Hindus are insecure in the country says Praveen Togadia
‘हिंदूंच्या विकासासाठी हनुमान चालीसा विकास यंत्रणा!’ प्रवीण तोगडिया म्हणाले…

सचिनने हा व्हिडीओ पोस्ट करीत कॅप्शनमध्ये लिहिले की, काश्मीर ही पृथ्वीवरील स्वर्गाच्या सर्वांत जवळची जागा आहे.

सचिनच्या या सुंदर पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला असून, त्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत. त्यावर माजी क्रिकेटपटू इरफान पठाण यानेही सचिन तेंडुलकरला काश्मीरची स्पेशल डिश ‘वाजमान’ ट्राय करण्याचा सल्ला दिला आहे.

तर एका चाहत्याने लिहिले की, ‘देव आणि स्वर्गाचे परफेक्ट कॉम्बिनेशन!

अलीकडेच सचिन पत्नी अंजली आणि मुलांसह श्रीनगरमधील बॅट बनविण्याच्या कारखान्यात पोहोचला होता. सचिन अचानक तिथे पोहोचला. साहजिकच बॅट बनविण्याच्या कामात गुंतलेले कारागीरही प्रत्यक्षात क्रिकेटच्या देवाला पाहून भारावून गेले. सचिनने बॅट बनविणाऱ्या कारागीरांशी चर्चा केली. त्याशिवाय उपस्थित चाहत्यांबरोबर फोटोही क्लिक केले. यावेळी सचिनने सूर्य मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

त्याशिवाय सचिन आपल्या पत्नीसह आग्रा येथे ताजमहाल पाहण्यासाठी गेला होता. सचिनला पाहताच तिथे आलेल्या पर्यटकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यावेळी अनेक पर्यटकांनी सचिनबरोबर फोटो करण्यासाठी एकच गर्दी केल्याचे दिसले.