Crocodile Attack Man Video : सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी काही लोक कोणत्याही थराला जाताना दिसतात. अनेकांना सोशल मीडियावर लाइक्स, कमेंट्स मिळविणे स्वत:च्या जीवापेक्षा महत्त्वाचे वाटू लागले आहे. त्यामुळेच अनेक जण भयानक प्राण्यांबरोबरही व्हिडीओ शूट करण्याचे धाडस करताना दिसतात. अशाच प्रकारे एक तरुण केवळ गंमत म्हणून एका भल्यामोठ्या मगरीशी खोडसाळपणा करतानाचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

धाडस की मूर्खपणा?

व्हिडीओत पाहू शकता की, एक महाकाय मगर चिखलात आरामात बसलीय. यावेळी एक तरुण हळूच मागून येतो आणि तिच्या शेपटीला पकडण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे तो उगीचच त्या शांत बसलेल्या मगरीला चिथवण्याचा प्रयत्न करतोय. तो हळूच मगरीची शेपटी पकडण्याचा प्रयत्न करतो; पण त्याने शेपटी उचलताच ती मगर गरकन मागे फिरते आणि अतिशय वेगाने तरुणावर हल्ला करण्याचा पवित्रा घेते. तिचा जबडा इतका मोठा आहे की, ती क्षणार्धात एखाद्याला पकडून त्याचे लचके तोडू शकते; पण तरुणाचे नशीब बलवत्तर म्हणून मगरीने त्याला काहीच इजा केली नाही. त्यानंतर त्या तरुणाने उडी मारून तिथून पळ काढला.

मगरीच्या हल्ल्याचा हा धक्कादायक व्हिडीओ @therealtarzann नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. माइक होल्स्टन नावाचा गृहस्थ वन्य प्राण्यांबरोबरचे अनेक व्हिडीओ पोस्ट करत असतो, ज्यांना खूप लाइक्स आणि कमेंट्स मिळत असतात. दरम्यान, हा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. त्यावर लोकही वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिलेय की, हे धाडस नाही; तर मूर्खपणा आहे. दुसऱ्याने म्हटलेय की, अशा प्रकारे मगरीशी खेळणं धोकादायक ठरू शकतं. तिसऱ्याने लिहिलेय की, तो वाचला हे नशीबच होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, माइक होल्स्टन त्याच्या @therealtarzann या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अनेकदा साप, वाघ व मगरीसारख्या धोकादायक प्राण्यांबरोबरचे धोकादायक व्हिडीओ शेअर करीत असतो, ज्यामुळे सोशल मीडियावर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत.