Crocodile Attack Dog Video : वन्यप्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी ते शिकारीचे असतात तर कधी एखाद्या गमतीदार प्रसंगाचे असतात. पण, काहीवेळा प्राण्यांचे असे काही व्हिडीओ व्हायरल होतात जे पाहून खूप भीती वाटते. यात आता एक महाकाय मगर आणि श्वानाच्या हल्ल्याचा अतिशय भयानक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. यात एक श्वान चक्क मगरीशी पंगा घेण्यासाठी जातो, पण मगर त्याची पुढच्याच क्षणी अशी काही अवस्था करून ठेवतो की पाहून तुम्हाला घाम फुटेल.
व्हिडीओत श्वान त्याच्या मालकाला मदत करण्यासाठी म्हणून त्याने काठीने पकडलेल्या मगरीवर हल्ला करताना दिसतो. पण, पुढच्याच क्षणी मगर त्याच्या जबड्यावर अशी काही गंभीर दुखापत करते की श्वान वेदनेने विव्हळू लागतो.
अनेकदा सांगितले जाते की नको तिथे नसते धाडस करायला जाऊ नका, अन्यथा तुम्हीच अडचणीत सापडू शकता. या व्हिडीओत श्वानाच्या बाबतही तेच घडले. व्हिडीओत पाहू शकता की, एक केअरटेकर स्टीलच्या रॉड आणि चिमट्याच्या मदतीने मगरीला कुंपणातून बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न करत असतो. यावेळी मगर शांत असते, पण तिथे श्वानाची एन्ट्री होताच मगर चवताळते.
यावेळी श्वानाला वाटते की, त्याचा मालक अडचणीत आहे म्हणून तो मदतीसाठी एक सेकंदही वाया न घालवता मगरीवर झडप घालतो. यावेळी तो तोंडाने मगरीचा जबडा पकडून ओढू लागतो आणि त्यावर जोरजोरात भुंकतो.
यानंतर पुढच्या क्षणी मालकाची पकड थोडी सैल होते, इथेच मगर संधी साधून श्वानाचा जबडा आपल्या जबड्यात जोरात पकडून ठेवते. पण, श्वानाचे तोंड मगरीच्या जबड्यात असे काही अडकते की तो स्वत:ची सुटकाच करून घेऊ शकत नाही, यामुळे तो तडफडू लागतो.
हा व्हिडीओ जरी धक्कादायक असला तरी लोक त्यावर मजेशीर कमेंट्स करत आहेत. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @foodiechina_ नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून काही जण हसत आहेत, तर काही जण श्वानाच्या शौर्याचे कौतुक करत आहेत. काही जण मगरीला “बॉस” असे म्हणत आहेत. एका युजरने लिहिले की, “भाऊ, मगरीला हलक्यात घेऊ नकोस, तो पाण्याचा थानोस आहे.” दुसऱ्याने खिल्ली उडवत लिहिले की, “श्वानाला वाटले की, तो सलमान खान आहे, पण मगरीने त्याला सांगितले की तो स्वतःच खलनायक आहे.” तिसऱ्याने लिहिले की, “त्याने एकाच वेळी त्याचा सर्व अहंकार मोडून काढला!”