scorecardresearch

Premium

चेन्नई जिंकताच चाहता झाला आऊट ऑफ कंट्रोल; हॉस्टेलमधील खिडकीत चढला अन्…, व्हायरल Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या CSK चाहत्याचा व्हिडीओ पाहून अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण होत आहे.

CSK fan viral video Twitter
सीएसकेने IPL ची ट्रॉफी जिंकताच या विद्यार्थ्याने हॉस्टेलमध्ये मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात केली. (Photo : Instagaram)

आयपीएलच्या १६ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने जेतेपदावर नाव कोरंल. IPL च्या इतिहासात चारवेळा जेतेपद जिंकणाऱ्या चेन्नईने धोनीच्या नेतृत्वात यंदाच्या हंगामातही आयपीएलचा किताब जिंकला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सोमवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील अंतिम सामना जोरदार रंगला. गुजरातने २० षटकात २१४ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर पु्न्हा एकदा मैदानात पावसाच्या सरी कोसळल्याने सामना डकवर्थ लुईसनियमानुसार चेन्नईला १५ षटकांत १७० धावांचं लक्ष्य गाठायचं होतं. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत अटीतटीचा झाला. ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, अंबाती रायुडू यांनी अप्रतिम फलंदाजी करून चेन्नईला विजयाच्या दिशेनं नेलं. परंतु, सामन्यात खरा रोमांचा पाहायला मिळाला तो म्हणजे मोहित शर्माच्या शेवटच्या षटकात.

कारण शेवटच्या दोन चेंडूवर चेन्नईला १० धावांची गरज होती. यावेळी अक्षरश: सीएसकेच्या चाहत्यांनी आपला श्वास रोखून धरला होता. कारण हा सामना आता गुजरात जिंकणार असंच सर्वांना वाटत होतं. त्यामुळे स्टेडीयममध्ये उपस्थित असणारे आणि मोबाईलवर कींवा घरातून हा सामना पाहणाऱ्यांना कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांना शेवटच्या दोन चेंडूमध्ये काय होणार? याची उत्सुकता लागून राहिली होती. अशातच शेवटच्या दोन चेंडूमध्ये रविंद्र जडेजाने चौकार-षटकार ठोकला आणि चेन्नईनं आयपीएलचा पाचवा किताब जिंकला. यावेळी धोनी डग आऊटमध्ये अगदी शांत बसला होता शिवाय तो कमालीचा भावुक झाल्याचं दिसत होतं. तर अनेक सीएसके समर्थक देवाला मनोमन आठवत असतानाच जडेजाने अंतिम सामना जिंकला.

canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
chandrashekhar bawankule
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून ‘प्लॅन बी’ तयार? बावनकुळे म्हणाले…
abhidnya bhave shared swami samarth experience
नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”
canada prime minister justin trudeau (1)
कॅनडाच्या पंतप्रधानांचं जी २० परिषदेवेळीच बिनसलं होतं? ‘या’ कृतीमुळे झाली होती भारतीय सुरक्षा यंत्रणेची अडचण!

हेही पाहा- …अन् अश्रू अनावर झालेल्या ‘त्या’ मुलीला जडेजाने न्याय मिळवून दिला; CSK चाहत्याचा भावूक करणारा ‘तो’ Video व्हायरल

सीएसकेने आयपीएलची ट्रॉफी जिंकताच संपुर्ण स्टेडीयमवर प्रेक्षकांनी आनंदाने उड्या मारायला सुरुवात केली. काही चाहत्यांना इतका आनंद झाला की त्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. पण सध्या सोशल मीडियावर अशा एका CSK चाहत्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही. हो कारण या व्हिडीओतील सीएसके समर्थक ज्या पद्धतीने त्याचा आनंद व्यक्त करत आहे. ते पाहून अनेकांना तो वेडा झाला की काय? अशी शंका आली आहे. व्हायरल व्हिडीओ एका बॉईज हॉस्टेलमधील असल्याचं दिसत आहे.

हेही पाहा – IPL फायनलच्या संध्याकाळी स्विगी इंस्टामार्टद्वारे २,४२३ कंडोमची विक्री, कंपनीने केले मजेदार ट्विट

यावेळी हॉस्टेलमधील एक तरुण लॅपटपवरकती अत्यंत गंभीरपणे हा अंतिम सामना पाहत असल्याचं दिसत आहे. शिवाय ज्यावेळी अशक्य असा सामना जडेजा जिंकतो तेव्हा या मुलाच्या आनंदाला पारावार राहत नाही. तो मोठमोठ्याने ओरडत हॉस्टेलमधील कपाटावर आपले हात आदळतो शिवाय तो खिडकीवर चढण्याचा देखील प्रयत्न करतो. हे पाहून तिथे उपस्थित इतर विद्यार्थी घाबरल्याचं दिसत आहेत. तर काही त्याला पाहून हसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी हा सीएसकेचा कट्टर समर्थक असल्याहचं म्हटलं आहे. तर काहींनी, “याचा हा हॉस्टेलमधील शेवटचा दिवस” असल्याचं म्हटलं आहे. शिवाय काहींनी हा व्हिडीओ पाहिल्यानंरतर आम्हाला हसू आवरता येत नसल्याचं म्हटलं आहे. सध्या या सीएसकेच्या चाहत्याचा व्हिडीओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-05-2023 at 16:58 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×