तुम्हाला मांजर आवडते का? आवडतं असेल तर हा व्हिडीओ तुम्हाला नक्की आवडेल. सोशल मीडियावर एका गोंडस मांजरीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडला आहे. तुम्हाला ऐकून थोडे धक्का बसेल पण व्हायरल व्हिडीओतील मनीमाऊने चक्क मराठमोळा साज शृंगार केला आहे. होय तुम्ही योग्य तेच ऐकत आहात. विशेष म्हणजे हा साज शृंगार अगदी शोभून दिसत आहे. तुम्ही जर मांजरप्रेमी असाल तर व्हिडीओ पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला या मांजराचे लाड करण्याचा मोह होईल.

प्राणी प्रेमी लोक अनेकदा मांजर-कुत्रा असे प्राणी पाळतात आणि त्यांना भरभरून प्रेम देतात. काही लोक त्यांना घरातील व्यक्ती असल्यासारखे प्रेम करतात. अनेकदा आपल्या पाळीव प्राण्यांना फॅन्सी कपडे घालतात किंवा गॉगल घालतात. पण आता लोक मांजरींना महाराष्ट्रीयन दागिणे आणि कपडे घालत आहे. इंस्टाग्रामवर naynahadkar_puralkar आणि lekhativramkar4087 या अकांउटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

हेही वाचा – हद्दच झाली राव! युनिफॉर्म स्विगीचा, बॅग झोमॅटोची अन् हेल्मेट…; डिलिव्हरी बॉयचा फोटो होतोय Viral

व्हिडीओमध्ये पाहू शकता की, पांढरी शुभ्र, गोड मांजर दिसत आहे. या मांजरीच्या गळ्यात पारंपारिक महाराष्ट्रीयन दागिणे घातले आहेत. तिच्या गळ्यात ठुशी घातलेली आहे. मांजरीच्या कपाळी चंद्रकोर असलेली टिकली लावली आहे. तिच्या नाकावर चमकीसाखी दिसणारी खड्याची टिकली लावली आहे. तसेच मांजरीच्या अंगावर पारंपारिक महाराष्ट्रीयन साडी सारखे दिसणारे कापड टाकले आहे. मनीमाऊचा मराठमोळा साज शृंगार फार गोड दिसत आहे. पण तिचे निळेशार डोळ्यांमध्ये पाहिले तर कोणीही तिच्या प्रेमात पडेल. मनीमाऊचे डोळे पाहून तुम्हीही म्हणाल “गं तुझं टपोरं डोलं जसं कोळयाच जालं…”, व्हिडीओला शेअर करताना हे गाणं जोडले आहे.

हेही वाचा – Video : ऐन हिवाळ्यात पुण्यात पडला पाऊस, पुणेकरांनी नव्या ऋतूचे केले नामकरण; म्हणे, “हा तर हिवसाळा”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ लोकांना फार आवडला आहे. लोक मनीमाऊच्या सौंदर्याचे कौतूक करत आहे. व्हिडीओवर लोकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले की, “अंगबाई तुम्ही पण ऐक किलोचा नेकलेस घातला का मनीला” दुसऱ्याने कमेंट केली, “फारचं गोड आहे.” तिसरा म्हणाला,”वाह, फार सुंदर ” चौथ्याने लिहिले, “काजळ लावालया पाहिजे होते, मग लय भारी डोळे दिसत होते” पाचव्याने लिहिले, “काय नजर आहे तिची यार”