cute video: महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर विरुद्ध विजय मिळवत इतिहास रचला आहे. देशभरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या विजयानंतर सर्वत्र आनंद साजरा करत सुरू असून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यातच एका लहानग्या मुलीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. टीम इंडियाच्या “बहिणींना” आत्मविश्वासाने सल्ला देणाऱ्या या छोट्या चाहतीने सर्वांच्या मनात घर केले आहे. तिच्या गोड भाषणातून झळकणारा देशभक्तीचा जोश आणि क्रिकेटप्रेम सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवत आहे.
हा व्हिडीओ भारतीय महिला क्रिकेट टीमसाठी छोट्या मुलीने दिलेल्या संदेशावर आधारित आहे. इन्स्टाग्रामवरील sahyadri_kourav या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून त्याला हजारो नाही तर लाखो व्ह्युज मिळाले आहेत. महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी चाहत्यांचा हा उत्साह असताना, या मुलीच्या व्हिडीओने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे.
व्हिडीओमध्ये ही गोंडस मुलगी अतिशय आत्मविश्वासाने आणि उत्साहाने भारतीय टीमला सांगते – “रन आउट नाही व्हायचं, छक्के मारायचे, कॅच सोडायचे नाहीत, प्रेशर घ्यायचं नाही, कारण जिंकणार आपणच!” तिचा आवाज, तिचं एक्स्प्रेशन आणि ती देत असलेली एनर्जी पाहून असं वाटतं की ही लहानगी खरंच एखाद्या कोचसारखीच मार्गदर्शन करतेय. यातील सर्वात गोड क्षण म्हणजे जेव्हा ती म्हणते – “जर भारत जिंकला तर मी माझ्या घरी सर्व बहिणींसाठी जेवण बनवणार” तिची ही निरागस पण जोशात भरलेली वाक्यं प्रत्येकाच्या मनाला भिडली आहेत.
पाहा व्हिडिओ
हा व्हिडीओ पाहून युजर्सनी प्रेमाने आणि मजेशीर पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिलं – “हे फिल्डिंग कोच थोडं लहान नाही का?” तर दुसऱ्याने म्हटलं – “या छोट्या कोचसारखा जोश जर आपल्या टीमकडे असेल, तर ट्रॉफी पक्का!” अनेकांनी तिच्या बोलण्याचं कौतुक करत लिहिलं की, “या वयात एवढा आत्मविश्वास!” काहींनी तर म्हटलं की, “ही छोटी फॅन आहे, पण तिच्यातला देशप्रेमाचा उत्साह लाखो चाहत्यांपेक्षा जास्त आहे.”

या व्हिडीओने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की क्रिकेट हा भारतासाठी फक्त खेळ नाही, तर भावना आहे. वय काहीही असो – छोट्या मुलींपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या मनात टीम इंडियासाठी एकच भावना आहे – “आपणच जिंकणार!
