Mumbai Crime News Latest Update : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सायबर क्राईम करणाऱ्यांनी मुंबईच्या एका डॉक्टरला आर्थिक गंडा घातला. घरबसल्या समोसा खाण्याची इच्छा डॉक्टरला महागात पडलीय. डॉक्टरने २५ प्लेट समोसे ऑनलाईन ऑर्डर केले होते. मात्र, या समोस्यांसाठी डॉक्टरला १ लाख ४० हजार रुपयांचा गंडा घालण्यात आलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑनलाईन पेमेंट करताना त्यांच्या खात्यातून ही रक्कम कमी झाली. डॉक्टरने ज्या हॉटेलमधून समोसे मागवले होते, त्यांनी फक्त १५०० रुपये देण्यास सांगितलं होतं. परंतु, त्यांच्या खात्यातून १.४० लाख रूपये कट झाले. या गंभीर प्रकरणाची नोंद डॉक्टरने भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असल्याचं समजते.

नक्की वाचा – पॅसिफिक महासागरात सर्फिंगला गेलेल्या तरुणाला सापडला ‘हा’ दुर्मिळ मासा, सर्वांना चकीत करणारा व्हिडीओ व्हायरल

२७ वर्षीय डॉक्टर मुंबईच्या सायन येथील केईएम रुग्णालयात नोकरी करतो. भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटलं की, ते शनिवारी मित्रांसोबत पिकनिकला जाणार होते. यासाठी त्यांनी गुरुकृपा हॉटेलला फोन केला आणि २५ प्लेट समोसे ऑर्डर केले. डॉक्टरला फोनवर त्यांनी १५०० रुपये देण्यास सांगितलं.

लिंक पाठवून पैसे मागितले

डॉक्टरने सांगितलं की, त्यांनी १५०० रुपयांचं पेमेंट केलं पण हॉटेलमधून त्यांना सांगण्यात आलं की, त्यांना पैसै मिळाले नाहीत. त्यानंतर डॉक्टरला पेमेंट करण्यासाठी एक लिंक पाठवण्यात आली. त्यांच्या खात्यातून २८ हजार रुपये कट झाले. हे पाहून डॉक्टरला धक्का बसला. अचानक पैसे कट कसे झाले, याचा तपास घेत असतानाच त्यांच्या खात्याशी संबंधित तीन-चार मेसेज आले आणि त्यांच्या खात्यातून पैसे कमी झाल्याचं त्यांना कळलं. डॉक्टरच्या खात्यातून १ लाख ४० हजार रूपये कट झाल्याने आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार डॉक्टरने भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cyber crime in mumbai doctor had to pay 1 lakh 40 thousand rupees for online food order of 25 plate samosa nss
First published on: 11-07-2023 at 12:49 IST