Dabangg Female Cop Rescues Driver from Burning Truck : कल्पना करा की, एखाद्या रस्त्यावर धावणाऱ्या ट्रकला आग लागली आणि आग विझवण्यासाठी पोलिस शर्थीचे प्रयत्न करत आहे. जळत्या ट्रकचा पोलिस पाठलाग करत आहेत आणि अखेर पोलिस चालकाचा जीव वाचवतात आणि ट्रकमध्ये लागलेली आगबी विझवतात. सहसा चित्रपटांमध्ये तुम्हाला असे दृश्य पाहायला मिळेल, पण प्रत्यक्षात असाच काहीसा प्रकार घडला आहे. सोशल मीडियावर अशाच एका चित्त थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही पण ही घटना प्रत्यक्षात घडली आहे. विशेष म्हणजे व्हायरल व्हिडीओमध्ये एक धाडसी महिला पोलिस अधिकारी ट्रक चालकाचा जीव वाचवते. एवढेच नाही तर ट्रकवर चढून ती आग विझवताना दिसत आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी दंबग महिला पोलिस अधिकारीच्या धाडसाचे कौतुक केले आहे.

नक्की काय घडले?

राजस्थानमधील पाली जोधपूर बायपासवर एका हॉटेलजवळून जाणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली. दरम्यान, एसआय शिमला जाट आणि त्यांची टीम त्यांच्या पोलिस जीपमधून कुडी भगतासनी पोलिस स्टेशनजवळून जात होते. दबंग पोलिस अधिकारीने धाडसाने ट्रकचा पाठलाग केला आणि जीपच्या लाऊडस्पीकरद्वारे ट्रक चालकाला ट्रक महामार्गावरून निर्जन ठिकाणी ट्रक हलवण्याची सूचना केली जेणेकरून इतर वाहने आणि जनतेला आगीच्या धोक्यापासून वाचवता येईल. यानंतर चालकाने ट्रक सुरक्षित ठिकाणी नेला, त्यानंतर पोलिस पथकाने ट्रक चालकाचा जीव वाचवला आणि नंतर एसआय शिमला जाट यांनी ट्रॅकवर चढून अग्निशमन दलाच्या पथकाला आग विझवण्यास मदत केली आणि आग आटोक्यात आणली. धाडसी अधिकारी शिमला यांच्या धाडसाचे सर्वजण कौतुक करताना दिसले. कुडी पोलिसांच्या पथकाचे या धाडसाचे नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.

ड्रायव्हरचा वाचवला जीव

शिमला जाटने यांनी लोकल १८ ला सांगितले की, रविवारी जोधपूर पाली महामार्गावर अहमदाबादहून पीपड सिटीकडे एक ट्रक जात होता. त्यानंतर शताब्दी सर्कलच्या पुढे असलेल्या गोरा हॉटेलजवळ ट्रकच्या मागील भागात आग लागली. दरम्यान, पोलिसांची जीप कुडी पोलिस ठाण्यात जात होती. त्याने ट्रकचा पाठलाग केला आणि लाऊडस्पीकरद्वारे जीपला ट्रक एका निर्जन ठिकाणी नेण्यास सांगितले. आगीची जाणीव होताच, ड्रायव्हरने ट्रक महामार्गापासून दूर नेला. त्यानंतर रिकामी जाहा पाहून ट्रक थांबवला. तसेच महिला पोलिस अधिकारीने ट्रक ड्रायव्हरला केबिनमधून बाहेर काढण्यास मदत केली आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले.

सर्वजण व्हिडिओ बनवू लागले

जळत्या ट्रकपासून स्वतःला आणि त्याच्या गाडीला दूर करण्यासाठी काही लोक धावपळ करत होत तर काही लोक त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यात हे दृश्य कैद करण्यासाठी ट्रकच्या मागे धावताना दिसले. सोशल मीडियावर अनेकांनी या घटनेचे व्हिडिओ शेअर केले आहेत आणि महिला पोलिस अधिकारीचे विशेष कौतुक केले आहे.

आगीची माहिती मिळताच बसनी अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली आणि आग आटोक्यात आणण्यात यश आले. सध्या आगीचे कारण अज्ञात आहे. ट्रक वाढदिवसाच्या सामानाने भरलेला होता. अग्निशमन दलाचे अधिकारी प्रशांत सिंह यांनी सांगितले की, “अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी पाठवण्यात आली आहे आणि आग आटोक्यात आणण्यात आली आहे. आगीचे कारण अज्ञात आहे. ट्रकमध्ये काही संस्थेचे सामान जात होते. कुडी पोलिस स्टेशन देखील घटनास्थळी उपस्थित होते. चालकाने वेळेत ट्रक एका निर्जन भागात नेल्याने जीवितहानी टळली.

View this post on Instagram

A post shared by rvs kudi 0055 (@rajveer_jodhpur_7773)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी आटोक्यात आणली आग

एका व्हायरल व्हिडीओमध्ये एक धाडसी महिला पोलिस अधिकारी ट्रक चालकाचा जीव वाचवते. एवढेच नाही तर ट्रकवर चढून ती आग विझवताना दिसत आहे. दरम्यान घटनास्थळी मोठ्या संख्येने लोक जमले होते. अग्निशमन दलात मुख्य अग्निशमन अधिकारी जलज घासिया, सहाय्यक अग्निशमन अधिकारी हेमराज शर्मा, बसनी अधिकारी प्रशांत सिंह चौहान, हिम्मत सिंह, रामजीत गुर्जर, भावेश, मोहन यादव, महेंद्र, फौजी राम यांचा समावेश होता. बसनी अग्निशमन दलाची गाडीही घटनास्थळी पोहोचली आणि आग आटोक्यात आणण्यात यश आले.