Dance Video Viral: इंटरनेटवर अनेक नवनवीन मराठी गाणी व्हायरल होत असतात. ही गाणी ट्रेंडमध्ये असली की सोशल मीडिया इन्फ्लूएंसर्ससह अनेक कलाकारांनाही यावर रील करायचा मोह आवरत नाही.

गेल्या काही महिन्यांपासून गुलाबी साडी, आप्पाचा विषय लई हार्ड हाय, बाया भुकेल्यान गं, बाया बांगुऱ्या मांगतान गं, नटीनं मारली मिठी अशी गाणी व्हायरल होत आहेत. या गाण्यांवर अनेकांनी डान्स करत आपली कला सादर केली आहे. ही गाणी ट्रेंडमध्ये असल्याने सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण सध्या एका मराठी जुन्या गाण्यावर दोन तरुणींचा डान्स व्हायरल होतोय. ज्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

तरुणींचा डान्स होतोय व्हायरल (Dance Video Marathi Old Song)

सोशल मीडियावर व्हायरल झालेला तरुणींचा डान्स पाहून तुम्हीदेखील नक्कीच कौतुक कराल. या व्हायरल व्हिडीओमध्ये २ तरुणींनी १९९४ मधील आशा भोसलेंच्या ‘फुलले रे क्षण माझे’ या गाण्यावर धमादेकार डान्स परफॉरमन्स केला आहे. दोघींनी अगदी विशिष्ट प्रकारे साडी नेसत हा डान्स केला आहे.

दोघींनी या डान्ससाठी मराठमोळा श्रृंगार केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय. अगदी सुंदर डान्स स्टेप करत या तरुणींनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तरुणींचा डान्स पाहून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे आणि भरभरून कमेंट्स केल्या आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला तरुणींटा व्हिडीओ @devshree_athalye या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसंच व्हिडीओ व्हायरल होताच याला १३ लाखापेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत. दरम्यान, या दोन्ही तरुणी डान्सर असल्याने त्यांच्या अकाउंटवर अनेक डान्सचे व्हिडीओ असल्याचं दिसून येतंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

तरुणींच्या डान्सचा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “खूप सुंदर” तर दुसऱ्याने “अतिशय उत्तम परफॉरमन्स” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “मराठी मुलींनी तर कमालच केली”