Viral video: सोशल मीडियावर कायम अनेक डान्स व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी लहान मुलांचे शाळेतील डान्स तर कोणाचा लग्नाच्या वरातीमधील डान्स. अनेक असे डान्स व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस येत असतात तर कधी अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या संख्येने नेटकऱ्यांच्या कायम आठवणीत राहत असतात. काही लोक इतक्या विचित्र पद्धतीने डान्स करतात की पाहूनच अजब वाटतं. तर काही अशाप्रकारे डान्स करतात की पाहतच राहावंस वाटतं. जे आपण पुन्हा पुन्हा पाहतो. सध्या सोशल मीडियावर मराठमोळ्या महिलांच्या एका ग्रुपचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओची सध्या सर्वत्र मोठी चर्चा होत आहे. सोशल मीडियावर सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच रील्स बनवत असतात. दरम्यान अशाच काही हौशी महिलांचा गृप डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हल्ली घरातली पुरुष मंडळीच काय, महिलादेखील डान्स करण्यात आघाडीवर असतात. घर सांभाळणारी महिला जेव्हा स्वतःमधलं डान्सचं टॅलेंट दाखवते, तेव्हा ते पाहून अनेकांना तिचं कौतुकही वाटतं. महिलांच्या चेहऱ्यावरचे भाव तुम्हालाही खूप आवडतील. या महिला इतकी सुंदर नाचतायत, की त्यावरून तुमची नजर हटणार नाही.

साडी नेसून या महिलांनी चाळीतल्या छोट्याशा जागेत भन्नाट डान्स केला आहे जो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.महिला वर्ग म्हणजे सतत काही ना काही कामात व्यस्त असणारा वर्ग. घरातली कामं तर संपता संपत नाहीत. त्यात सणवार, पाहुणेरावळे, आजारपणं असं सगळं करताना आपली अगदी दमछाक होऊन जाते. मात्र या महिलांनी हे सगळं सांभाळून स्वत:लाही वेळ दिला आहे. या महिलांनी जुनं मराठी गाणं “साखरबाईचा नाद येडाखूळा हाय” डान्स केला आहे. या गाण्यावर डान्स केला आहे. विशेष म्हणजे त्यांचा डान्स व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. हल्ली मराठी गाण्यांवर फारसं कुणी डान्स करताना दिसत नाही, मात्र या महिलांनी मराठी गाण्यावर असा डान्स केला आहे की, पाहून तुम्हीही थिरकायला लागाल.

पाहा व्हिडीओ

एकदा कॉलेजचा उंबरठा ओलांडला की, नोकरी, करिअर, लग्न, मुलं या सगळ्या चक्रात फिरता-फिरता अक्षरश: दमछाक होते, विशेषतः महिलांची! ‘ती’ कणखर असते, सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची ताकद तिच्याइतकी कुणातही नाही, वगैरे प्रोत्साहनपर कौतुक कधी तरी कानी पडतं. त्यातून तिला जरा बळही मिळतं आणि ती धावत राहते अखंड, पण अचानक आयुष्याच्या मध्यावर हे धावणंच निरर्थक वाटू लागतं. आयुष्यात आपण केवळ कष्ट केले आणि हाती काही गवसलंच नाही, अशा विचारांचं काहूर माजतं आणि मग स्वत:चाच शोध पुन्हा सुरु होतो. अशाच या महिला ज्या स्वत:ची आवड जपत मनसोक्त आयुष्य जगत आहेत.