मुंबई पोलिसांनी मोटरसायकल स्टंटचा एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि हे दोन दुचाकीस्वार अडचणीत आले आहेत. दुचाकीस्वारांवर धोकादायक पद्धतीने ड्रायव्हिंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांचा परवाना देखील निलंबित करण्यात आला आहे, असे विभागाने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करताना लिहिले आहे.छोट्या क्लिपमध्ये हे दोघेही हेल्मेटशिवाय बाईक चालवताना दिसत आहेत. रस्त्याने जाताना ते आधी काही डायलॉगवर अभिनय करतात नंतर त्यामध्ये स्टंटचा भाग म्हणून, मागे बसलेला मुलगा दुचाकी चालवत असलेल्याला चालकाला चाकूने मारतो आणि पुढे दुचाकीवरून उतरतो. मग ड्रायव्हर स्वतः रस्त्यावर पडल्याचा अभिनय करत असताना व्हिडीओ संपतो कारण तिथून जाणारा एक माणूस त्यांना बघतो.

पोलिसांची कारवाई

क्लिप शेअर करताना, मुंबई पोलिसांनी एक्वाच्या हिट ‘बार्बी गर्ल’ गाण्याचे शब्द वापरून सर्व स्टंट रायडर्सना इशारा दिला. “लक्ष द्या बार्बी गर्ल, हे खरे जग आहे जीवन प्लास्टिक नाही- सुरक्षितता चांगली!” पोलिस विभागाने नेटीझन्सला आठवण करून दिली. ते पुढे लिहतात की, दोन्ही आरोपींवर आयपीसीच्या कलम २७९ आणि एमव्हीए कलमांखाली धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेटीझन्सच्या प्रतिकिया

हा व्हिडिओ ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर हजारो व्ह्यूजसह व्हायरल झाला आहे. मुंबई पोलिसांची चूक लक्षात आणून द्यायची पद्धत अनेकांना खूप आवडली आहे. मुंबई पोलीस त्यांच्या या हटके स्टाईलने नेहमीच असे व्हिडीओ, फोटो, मिम्स पोस्ट करत असतात. फक्त ९ सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. “अरे बार्बी गर्ल गाणे माझ्या किशोरवयीन काळात खूप प्रसिद्ध हिट ट्रॅक होते, मुंबई पोलीस तुम्ही आजकाल खूप मनोरंजन करत आहात.” एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिले. “महान काम, मुंबई पोलीस” असं दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले.

मुंबई पोलिसांनी पोस्ट केलेला व्हिडीओ:

नेटीझन्सचा मुंबई पोलिसांना सपोर्ट

अनेकांनी मुंबई पोलिसांचं या कामगिरीबद्दल कौतुक केलं आहे.

तुमचं काय मत आहे या व्हिडीओवर?