आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतात ते आपले वडील असतात. कोणतीही गोष्ट न मागता आपल्याला आणून देतात ते वडील असतात. वडील आपल्या मुलांवरचं प्रेम बोलून दाखवत नाहीत. पण मुलांसाठी केलेल्या निस्वार्थ कृतीतून त्यांचे प्रेम दिसून येते. सध्या सोशल मीडियावर यासंबधित एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. अलीकडे, एका तरुणीने आपल्या वडिलांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आणि लोकांना सांगितले की तिचे वडील कशाप्रकारे तिची काळजी घेत आहेत.

इंस्टाग्राम युजर श्रीलक्ष्मीने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, जो तिच्या वडिलांचा होता. जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपले वडील आपल्याला शाळेत सोडायला यायचे. त्यानंतर कॉलेजमध्ये देखील सोबत असायचे. पण आता लांबचा प्रवास करायचा असो तेव्हाही ते आपल्याला स्टेशनवर सोडायला येतात. हेच त्या वडिलांचे प्रेम आहे जे मोठे झाल्यावरही आपल्या मुलांना मोठे समजत नाहीत आणि लहानपणी सारखे लाड करतात.

वडिलांनी मुलीवरचे प्रेम व्यक्त केले..

या व्हिडिओ मध्येही असंच काहीसं दाखवण्यात आलं आहे. व्हिडिओ शेअर करताना श्रीलक्ष्मीने सांगितले की ती ३३ वर्षांची आहे, तरीही तिचे वडील तिला स्टेशनवर सोडण्यासाठी येतात आणि ट्रेनमध्ये बसल्यानंतरच तेथून निघून जातात. हा व्हिडिओ तरुणीने तिच्या वडिलांच्या नकळत रेकॉर्ड केला होता. या व्हिडिओमध्ये तिचे वडील पुढे चालताना दिसत आहेत तर त्यांची मुलगी मागे सर्व रेकॉर्ड करत आहे.

व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय..

( हे ही वाचा: भारतातील ‘या’ शहरात आहे जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म; नावं वाचून तुम्हीही थक्क व्हाल)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडिओला ६२ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. श्रीलक्ष्मीने कॅप्शनमध्ये सांगितले की, जेव्हा तिच्या वडिलांनी हा व्हिडिओ पाहिला तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना वडिलांनीही लिहिले- ‘तू माझे आयुष्य आहेस!’ तर एका व्यक्तीने यावेळी कंमेंट केली आहे की, वडील आपल्या मुलांसाठी जेवढी मेहनत करतात, तेवढी दाद मिळत नाही. तर दुसऱ्याने सांगितले की, त्याचे वडीलही असेच होते पण आता ते या जगात नाहीत.