Mumbai Snake Viral Video: एका सामान्य रात्रीसारखीच ती रात्री होती… मुसळधार पाऊस, मुंबईच्या आरे कॉलनीत अंधार दाटलेला आणि घराच्या बाहेर ठेवलेल्या चपलांमागे काहीतरी लपलेलं. घरातील सदस्य चपला घेण्यासाठी पुढे गेला आणि क्षणातच अंगाला एक थरारक झटका बसला. जे दिसलं ते अविश्वसनीय होतं. मृत्यू तिथे दबा धरून बसला होता. चपलेमागे पाहिलं आणि थरकाप उडाला… कारण समोर होता एक अत्यंत विषारी साप. हा प्रसंग केवळ धडकी भरवणारा नाही, तर पावसाळ्यातील निष्काळजीपणाची किंमत किती जीवघेणी ठरू शकते, याची जाणीव करून देणारा आहे. पुढे काय झालं? आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेला थरारक व्हिडीओ नेमका काय दाखवतो? हे जाणून घ्या…

मुंबईतल्या आरे कॉलनीमध्ये एका घराबाहेर ठेवलेल्या चपलांमागे काय लपून बसलं होतं, हे पाहून घरच्यांच्या अंगावर काटा आला. पावसाळा सुरू झालाय आणि बिळात राहणारे प्राणी आता राहत्या जागेच्या शोधात बाहेर पडू लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर, एका चपलेच्या मागे लपलेला होता सर्वात विषारी सापांपैकी एक रसेल्स वायपर (Russell’s Viper) प्रजातीचा साप.

घटना रात्रीच्या वेळी घडली. चपलांवर पाय ठेवण्याआधीच घरातील कुणीतरी काहीतरी हालचाल जाणवली म्हणून टॉर्च मारला आणि तेव्हा लक्षात आलं मृत्यू एका चपलेच्या अंतरावर उभा होता. सुदैवानं, कोणीही त्या सापावर चुकूनही पाय ठेवला नाही, नाहीतर पुढचा भाग कदाचित बातमी न राहता शोकवार्ता ठरली असती.

घरच्यांनी वेळ न दवडता सर्पमित्रांना संपर्क केला. काही वेळातच सर्पमित्र घटनास्थळी पोहोचले आणि सुरू झालं थरारक रेस्क्यू ऑपरेशन. हा साप पकडताना त्याने आक्रमक मुद्रा घेतली आणि आपलं शरीर फुगवायला सुरुवात केली. ही त्याची ओळख आहे, कारण तो धोका आल्यावर स्वतःला मोठं दाखवून विरोधकाला घाबरवण्याचा प्रयत्न करतो.

व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतं की, सर्पमित्रांनी अत्यंत शांत आणि प्रशिक्षित पद्धतीने सापाला ताब्यात घेतलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे आणि तो पाहून अनेक जण थक्क झाले आहेत.

रसेल्स वायपर हा केवळ सौम्य चावणारा साप नाही. त्याचं विष हेमोटॉक्सिक असतं, म्हणजेच ते रक्तात गुठळ्या निर्माण करतं, रक्ताभिसरण प्रणालीवर थेट परिणाम करतो. हा साप चावल्यावर शरीर सुजतं, वेदना असह्य होतात आणि वेळेत उपचार न मिळाल्यास मृत्यू निश्चित मानला जातो.

विशेष म्हणजे हा साप सामान्यतः जंगल, झाडी किंवा ओलसर मातीच्या भागात सापडतो. मात्र, आता वाढत्या शहरीकरणामुळे तो घराजवळच्या अडगळीच्या जागांमध्येही आढळू लागला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा व्हिडीओ

तर खबरदारी घ्या!

पावसाळ्यात बूट-चपला घालण्याआधी नीट पाहा. घरातील कोपऱ्यांत, पिशव्यांच्या मागे, अडगळीच्या ठिकाणी काही हालचाल जाणवली तर दुर्लक्ष करू नका. सर्पमित्रांना तात्काळ संपर्क करा.

कधीकधी मृत्यू अगदी पायाशी लपून बसलेला असतो. आरे कॉलनीमधील ही घटना त्याचं जिवंत उदाहरण आहे.