मेट्रो ही आज हजारो दिल्लीकरांची लाईफलाईन असल्याचे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही, कारण दिल्लीतील मोठा वर्ग दररोज मेट्रोने प्रवास करतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून दिल्ली मेट्रो अनेक विचित्र घटनांमुळे चर्चेत आली आहे. कधी कोणता प्रवासी दिल्ली मेट्रोत बिकिनी घालून प्रवास करतोय, कधी कोणता प्रवासी मेट्रोत दात घासतोय, तर कधी कोणी सीटच्या कॉर्नरला बसून अश्लील चाळे करत असल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. या व्हिडीओंवर सोशल मीडियावर युजर्सनी तीव्र संताप व्यक्त केला. यानंतर दिल्ली मेट्रो प्रशासनाने संबंधित प्रवाशांच्या कृतीची दखल घेत काही नियम तयार केले आहेत. पण मेट्रोतील अश्लील व्हिडीओ प्रकरणानंतर आता दिल्लीतील कॅब चालकांनीही एक सावध पवित्रा घेतला आहे.
दिल्लीतील काही कॅब चालकांनी प्रवाशांना कॅबमध्ये बसून रोमान्स करण्यास परवानगी नसल्याची नोटीस चिटकवली आहे. ज्या नोटीसचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
कॅबमध्ये रोमान्सला परवानगी नाही
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती उबेर कॅबमध्ये बसल्याचे तुम्ही पाहू शकता. यावेळी सीटच्या मागील बाजूस एक मजेदार नोटीस चिटकवण्यात आली आहे, ज्यामध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘रोमान्स नॉट अॅलॉड इन कॅब’. हे पाहून बसलेला व्यक्ती म्हणतो की, हा दिल्ली मेट्रोचा प्रभाव आहे. नशीब मी आज माझ्यासोबत गर्लफ्रेंडला घेऊन आलो नाही. यावर कॅब चालक एक कमाल रिअॅक्शन देतो. हा व्हिडीओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरता येणार नाही.
गजब बेइज्जती है यार, युजर्सची रिअॅक्शन
दिल्ली कॅबमधील हा मजेशीर व्हिडिओ @thatguywithbeard नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. आत्तापर्यंत हा व्हिडिओ २५ लाखांहून अधिक युजर्सनी पाहिला आहे, तर ३ लाखांहून अधिक युजर्सनी तो लाइक केला आहे. या व्हिडीओवर आलेल्या काही कमेंट्स देखील एकदम हास्यास्पद आहेत. एका युजरने म्हटले की, फटाफट एफआयआर दाखल करा. तर काही युजर्स ये गजब बेइज्जती है यार म्हणत आपली रिअॅक्शन देत आहेत.