नोटांबंदीच्या निर्णयानंतर अनेक नागरिक वेगवेगळ्या समस्यांना समोरे जात आहेत. अशातच सगळ्यात जास्त हाल झालेत ते लग्नघराचे. लग्नसराईचे दिवस सुरु आहेत प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी पैशांची गरज आहे पण बँक आणि एटीएममधून पैसे काढण्यावर घालण्यात आलेल्या मर्यादेमुळे अनेक अडचणींचा समोरे जावे लागत आहे. गुजरातमधल्या एका जोडप्यालाही अशाच समस्येला समोरे जावे लागले आहे. त्यामुळे, फक्त ५०० रुपयांत त्यांनी आपला लग्नसमारंभ आटोपला आहे.

वाचा : लग्नात असे खर्च झाले ५०० कोटी रुपये

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहिर केला, त्यामुळे ५०० आणि १००० च्या जून्या नोटा या चलनातून बाद होऊन त्यांची जागा नव्या दोन हजार आणि ५०० च्या नोटांनी घेतली आहे. हा चलनकल्लोळ आटोक्यात आणण्यासाठी काही वेळ जावा लागेल त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगावा असे आवाहन करण्यात आले. पण दोन आठवडे अलटूनही परिस्थिती आटोक्यात आली नाही. यात अनेकांचे हाल झाले आहेत. अशातच गुजरातमधल्या सुरत येथे राहणा-या दक्षा आणि भरत परमार या जोडप्याला फक्त ५०० रुपयांत हा विवाह सोहळा आटोपावा लागला. त्यांच्या लग्नाची तारिख आधिक ठरली होती. या दोघांच्याही कुटुंबियांना अगदी धुमधडाक्यात विवाह सोहळा साजरा करायचा होता. पण, ऐन वेळी नोटाबंदीच्या निर्णयामुळे या सगळ्या आशा आकांक्षावर पाणी फेरले. त्यामुळे फक्त जवळच्या पाहुण्यांना बोलावून चहा पाण्यावरच त्यांनी आपला विवाह सोहळा साजरा केला.

वाचा : आहेराची चिंता मिटली

‘मोदींनी काळा पैशावर चाप लावण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे’. पण, पैशांची कमतरता असल्याने आम्ही अशा प्रकारे चहा देऊन विवाह समारंभ साजरा केल्याची प्रतिक्रिया या दोन्ही वधु वराने ‘एएनआय’ला दिली आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे लग्नघरात हिच अडचण आहे त्यामुळे, अनेकांनी आपल्या लग्नाची तारिख पुढे ढकलल्याचेही पाहायला मिळत आहे. दरम्यान लग्नघरातील अडचणी लक्षात घेता सरकार आणि आरबीआयने पैसे काढण्याची मर्यादा वाढवली होती. काही अटींची पूर्तता करुन लग्नघरातील नागरिक अडीच लाखांपर्यंतची रक्कम काढू शकतात.

https://twitter.com/ANI_news/status/801988778734690304

https://twitter.com/ANI_news/status/801989909397417984

https://twitter.com/ANI_news/status/801990761298300928