पाकिस्तानमधील लोक काही ना काही करत चर्चेत असतात. त्यांच्या करामतींचे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत. ते कधी काय करतील याचा नेम नाही. कधी कधी ते आपली कॉपी देखील करताना दिसतात. त्यातच बॉलिवूड चित्रपटांचे चाहते जगभरात आहेत हे आपल्याला माहितीच आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. पाकिस्तानमधील एका विद्यापिठातील विद्यार्थ्यांनी चक्क क्लासिक बॉलीवूडच्या अंदाजात लग्न केलं आहे. दरम्यान पाकिस्तानमधील एका कॉलेजमधल्या भलत्यात प्रथेचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हे पाहून भारतातील बॉलिवूडचं वेड पाकिस्तानातही पोहचल्याचा अंदाज तुम्हाला येईल.

पाकिस्तानी कॉलेजमध्ये भलतीच प्रथा –

पाकिस्तानमधील विद्यापिठातील विद्यार्थ्यांनी केलेले हे लग्न बनावट असल्याचं समोर आलं आहे. विद्यापिठाच्या एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बनावट लग्नाचा घाट घातला होता. मात्र हे लग्न चर्चेत आलं ते बॉलिवूडच्या गाण्यांनी. विद्यापिठातील दोन सिनीयर विद्यार्थ्यांनी एकमेकांशी लग्न केलं आणि इतर विद्यार्थ्यांनी लग्नाला हजेरी लावली. यावेळी नवरी आणि नवरदेव अगदी खऱ्याखुऱ्या लग्नासारखेच नटले होते. तसेच लग्नाला हजेरी लावलेले इतर विद्यार्थीही पारंपारिक वेषात दिसत आहेत. मात्र लग्नात खरा ट्विस्ट आणला तो बॉलिवूड गाण्यांनी, नवरा नवरीच्या या डान्सने सगळ्यांनाच वेड लावलं होतं. दरम्यान दरवर्षी अशा पद्धतीनं बनावट लग्नाचा कार्यक्रम आयोजीत केला जातो. दरवर्षी मुलं निवडायची, लग्न करायचं अशी ही पाकिस्तानच्या कॉलेजमधील आगळीवेगळी प्रथा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा व्हिडीओ –

व्हिडिओ लॉर्ड अयान नावाच्या युजरने ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर पसंती मिळत असून नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. कोणी त्यांचे कौतुक केले आहे तर कोणी बॉलिवूडचा प्रचार करण्याची गरजच काय असेही म्हणले आहे.