Viral Video : अनेक लोकांना घरी झाडे लावण्याची आवड असते. झाडांना नियमित पाणी देणे, झाडांची काळजी घेणे त्यांना खूप आवडते. एखाद्या वेळी ही लोकं एका दिवसासाठी बाहेर फिरायला गेली तरी झाडांना पाणी कोण घालणार, याचं त्यांना टेन्शन येतं, पण टेन्शन घेऊ नका.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा भन्नाट जुगाड एकदा पाहा. इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये क्रिएटिव्हिटी दाखवत झाडांना पाणी घालण्यासाठी एक अनोखा जुगाड केला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतेय की, एका प्लास्टिकच्या बाटलीने झाडांना पाणी दिले जात आहे. विशेष म्हणजे ही पाण्याने भरलेली बाटली कोणी हातात धरलेली नसून ही खास पद्धतीने झाडांच्या वरती लटकवलेली आहे. या बाटलीला चार छिद्रे पाडली असून या छिद्रांच्या मदतीने एका बाटलीतून एकाच वेळी चार झाडांना पाणी दिले जात आहे.
हा भन्नाट जुगाड पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या ट्रिकमुळे घरी कोणी नसतानासुद्धा तुम्ही झाडांना पाणी घालू शकता आणि झाडांना पाणी घालण्यासाठी तुम्हाला कुणाला सांगायची गरज पडणार नाही. फक्त घरातून बाहेर पडण्यापूर्वी तुम्हाला ही बाटली पाण्याने भरून ठेवावी लागेल.

हेही वाचा : Desi Jugaad : देशी जुगाड! निकाम्या प्लास्टिकच्या बाटलीने तोडा झाडावरील फळे, VIDEO एकदा पाहाच!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

agriculture_life_ या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “देशी जुगाड.” या अकाउंटवर असे अनेक शेतीविषयक आणि झाडांशी संबंधित एकापेक्षा एक भन्नाट जुगाडाचे व्हिडीओ शेअर केलेले आहेत.