scorecardresearch

Premium

Desi Jugaad : तुम्ही घरी नसताना झाडांना पाणी कोण घालणार? टेन्शन घेऊ नका, हा भन्नाट जुगाड पाहा…

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा भन्नाट जुगाड एकदा पाहा. इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये क्रिएटिव्हीटी दाखवत झाडांना पाणी घालण्यासाठी एक अनोखा जुगाड केला आहे.

desi jugaad
तुम्ही घरी नसताना झाडांना पाणी कोण घालणार? टेन्शन घेऊ नका, हा भन्नाट जुगाड पाहा… (Photo : Instagram)

Viral Video : अनेक लोकांना घरी झाडे लावण्याची आवड असते. झाडांना नियमित पाणी देणे, झाडांची काळजी घेणे त्यांना खूप आवडते. एखाद्या वेळी ही लोकं एका दिवसासाठी बाहेर फिरायला गेली तरी झाडांना पाणी कोण घालणार, याचं त्यांना टेन्शन येतं, पण टेन्शन घेऊ नका.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा भन्नाट जुगाड एकदा पाहा. इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये क्रिएटिव्हिटी दाखवत झाडांना पाणी घालण्यासाठी एक अनोखा जुगाड केला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतेय की, एका प्लास्टिकच्या बाटलीने झाडांना पाणी दिले जात आहे. विशेष म्हणजे ही पाण्याने भरलेली बाटली कोणी हातात धरलेली नसून ही खास पद्धतीने झाडांच्या वरती लटकवलेली आहे. या बाटलीला चार छिद्रे पाडली असून या छिद्रांच्या मदतीने एका बाटलीतून एकाच वेळी चार झाडांना पाणी दिले जात आहे.
हा भन्नाट जुगाड पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या ट्रिकमुळे घरी कोणी नसतानासुद्धा तुम्ही झाडांना पाणी घालू शकता आणि झाडांना पाणी घालण्यासाठी तुम्हाला कुणाला सांगायची गरज पडणार नाही. फक्त घरातून बाहेर पडण्यापूर्वी तुम्हाला ही बाटली पाण्याने भरून ठेवावी लागेल.

Mumbai Local Train Video
Mumbai Video : लोकलच्या महिला डब्यात महिलांचाच राडा, व्हिडीओ होतोय व्हायरल
Waiter carries more than a dozen plates at once over his one hand
VIDEO : “ऐ भाई, ज़रा संभाल के..!” वेटरची ही अनोखी कला पाहून व्हाल अवाक्, व्हिडीओ होतोय व्हायरल
when spider man come to
स्पायडर मॅन जेव्हा गावाकडे येतो… शेतीचे काम करताना दिसला लहानग्याचा सुपरहिरो, पाहा स्पायडर मॅन शेतकऱ्याचा VIDEO
a traffic police keep his duty in filmy style while controlling traffic on the highway
कर्तव्याला कलेची जोड! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याने दाखवला फिल्मी स्टाइल अंदाज, व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा : Desi Jugaad : देशी जुगाड! निकाम्या प्लास्टिकच्या बाटलीने तोडा झाडावरील फळे, VIDEO एकदा पाहाच!

agriculture_life_ या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “देशी जुगाड.” या अकाउंटवर असे अनेक शेतीविषयक आणि झाडांशी संबंधित एकापेक्षा एक भन्नाट जुगाडाचे व्हिडीओ शेअर केलेले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Desi jugaad how to water your home plants in absence best trick of water bottle for watering plants video goes viral ndj

First published on: 02-10-2023 at 18:21 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×