सध्याच्या डिजीटल जमान्यात अनेक लोकांची सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याच्या घटना समोर येत असतात. पोलिसांकडून वारंवार फसवणूक करणाऱ्या लोकांपासून सावध राहण्याच्या सूचनाही दिल्या जातात. तरीही अनेक लोक या फसवणुकीला बळी पडतात. सध्या एक अशीच फसवणुकीची एक घटना उघडकीस आली आहे. ज्यामध्ये बनावट बेवसाइट आणि व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून अनेक लोकांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही फसवणूक मध्य प्रदेशातील प्रसिद्ध कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या नावाने केली आहे. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या नावाने पुस्तके आणि रुद्राक्ष देण्यासाठी मिश्रा यांच्या भक्तांकडून ५००-५०० रुपये घेणाऱ्या राजस्थानातील दोन आरोपींना पोलिसांकडून अटकही करण्यात आली आहे. याबाबतची माहिती आजतक या हिंदी वृत्तवाहिनीने दिली आहे.

हेही पाहा- दोन मांजरींचा बाईकवरील प्रवासाचा Video होतोय व्हायरल, नेटकरी म्हणतायत ‘विश्वास आणि प्रेम…’

सिहोर जिल्ह्या मंडी पोलिस स्टेशनचे प्रभारी हरीसिंह परमार यांनी सांगितले की, बनावट वेबसाइट आणि व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून मिश्रा यांच्या भक्तांची फसवणूक करण्यात आली आहे. पंडित प्रदीप मिश्रा यांनी लिहिलेली पुस्तके व रुद्राक्ष मागविण्याच्या नावाखाली आरोपींनी भक्तांकडून ५००-५०० रुपये जमा केले होते. मात्र, भाविकांना रुद्राक्ष व पुस्तके न मिळाल्याने त्यांनी पंडित प्रदीप मिश्रा यांच्या आश्रमाशी संपर्क केला तेव्हा त्यांना वेबसाईटच्या माध्यमातून रुद्राक्ष देण्याची व्यवस्थाच आश्रमात नसल्याचं सांगिण्यात आलं. हे ऐकताच भक्तांना त्यांची फसवणूक झाल्याचं समजलं आणि त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली.

हेही वाचा- ऑर्डर पोहोचवण्यासाठी गेला तो परतलाच नाही, कुत्र्याच्या भीतीने Swiggy बॉयने तिसऱ्या मजल्यावरुन मारली उडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपींनी पंडित प्रदीप मिश्रा यांचा फोटो टाकून वेबसाइट आणि व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केल्याची तक्रार विठ्ठलेश सेवा समितीचे सदस्य समीर शुक्ला यांनी मंडी पोलिस स्टेशनमध्ये केली. शिवाय मिश्रा यांच्या फोटोंच्या आधारे आरोपी भक्तांची फसवणूक करत होते. आरोपींनी समितीच्या क्यूआर कोडच्या जागी स्वतःचा क्यूआर कोड लावला होता. दरम्यान, सिहोर पोलिसांनी मिळालेल्या तक्रारीवरून विकास विश्नोई आणि मदनलाल या दोन आरोपींना राजस्थानमधून अटक केली आहे. पोलिसांकडून आरोपींविरुद्धची पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. तर नागरिकांनी अशा फसवणूक करणाऱ्या वेबसाइट आणि व्हॉट्सअॅप मेसेजला बळी पडू नये असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.