Disgusting Viral Video : हल्ली लोकांना प्रसिद्ध होण्याचे इतके वेड लागलयं की त्यांना काहीही करून लोकांच्या नजरेत राहायचे असते. यासाठी कुठे कोण गटारात जाऊन लोळतय, तर कुठे कोण रस्त्यावरील चिखल ब्रेडला लावून खातंय. अशा विचित्र गोष्टींच्या माध्यमातून हल्ली काही इन्फ्लुएंसर लोकांचे लक्ष वेधून घेण्याच्या प्रयत्नात असतात. पण, हे व्हिडीओ पाहताना खूप किळसवाणे आणि घाणेरडे वाटतात. सध्या अशाप्रकारे एका इन्फ्लुएंसरचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात इन्फ्लुएंसर तरुणी ब्रा आणि पँटी घालून हातात माईक घेऊन भररस्त्यात लोकांना प्रश्न विचारताना दिसतेय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी तीव्र संताप व्यक्त केला आहे, तर काही युजर्सनी तरुणीला वाईटरित्या ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एक तरुणी लाल रंगाची ब्रा आणि पँटी घालून हातात माईक आणि बरोबर एक कॅमेरामन घेऊन रस्त्याने चालतेय. यावेळी रस्त्यावरून येणारे-जाणारे लोक तिच्याकडे आश्चर्याने बघत आहेत, तर काही तरुण तिचा हा अवतार पाहून लाजेने मान घाली घालून निघून जात आहेत. यावेळी ती इन्फ्लुएंसर तरुणी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका व्यक्तीकडे जाते. माईक त्याच्या तोंडासमोर पकडून प्रश्न विचारते की, जर मी असे कपडे परिधान करत आहे तर ते माझ्यासाठी ठीक आहे का? असे कपडे घालून फिरणाऱ्या मुलींसाठी हा परिसर सुरक्षित आहे का? यावर ती व्यक्ती म्हणते की, तुमच्याकडे कोण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतोय यावर ते अवलंबून आहे.

इन्फ्लुएंसर तरुणी ब्रा-पँटी घालून रस्त्यावर उतरली अन्….

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच युजर्सनी तरुणीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. पण, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे यासंदर्भातील माहिती समोर आलेली नाही. पण, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्या तरुणीवर संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी व्हिडीओ पुन्हा पोस्ट करत लिहिले की, रील नावाची कीड आता पूर्णपणे लोकांच्या मनात शिरली आहे, लोक आता प्रसिद्ध होण्यासाठी आणि इतरांचे लक्ष वेधण्यासाठी काहीही करत आहेत. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, अशाप्रकारचे कपडे घालून लाईम लाईटमध्ये येणं हे या तरुणीचं काम आहे, तरुणीचे संपूर्ण इन्स्टाग्राम अशाच पोस्टने भरले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

@gsneemroth15 नावाच्या एक्स अकाउंटवरून त्या तरुणाची एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर आता अनेकांनी कमेंट्स करत रोष व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिलेय की, हे आता अति होतय, लोक प्रसिद्ध होण्यासाठी नग्न होत आहेत. आणखी एका युजरने लिहिलेय की, जर मुलं असे कपडे घालून रस्त्यावर आली तर काय होईल? शेवटी एका युजरने लिहिलेय की, ही तरुणी ट्रान्सजेंडरसारखी दिसत आहे.