सायकल हे अनेकांचे पहिले प्रेम असेल, लहानपणी स्वत: सायकल असणे म्हणजे खूप मोठी गोष्ट होती, एखाद्या कारला सांभाळावे तसे अनेकजण आपल्या सायकलची काळजी घेत असे. याशिवाय सायकल अॅक्सेसरीजच्या नावाखाली अनेक जण आपल्या सायकलला कलरफूल लाईटिंग, हॉर्नसह काही युनिक पद्धतीने सजवतात. पण एका म्युझिकप्रेमी व्यक्तीने आपल्या सायकलला अशा काही हटके पद्धतीने मॉडिफाय केले आहे जे पाहून सायकल प्रेमीच काय तुम्हाला देखील खूश व्हाल.

सायकल चालवणारे बहुतेक लोक आपली सायकल फारशी मॉडिफाय करत नाहीत. पण या म्युझिकप्रेमी व्यक्तीने एखाद्या कारप्रमाणे आपल्या सायकलला मॉडिफाय करत त्यावर एक म्युझिक सिस्टीम बसवली आहे, यामुळे ही जरा हटके सायकल आता लोकांना पुन्हा पुन्हा पाहण्याची इच्छा होतेय. हा हटके सायकलचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सायकलच्या कॅरीयरवर बसवली तगडी म्युझिक सिस्टीम

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या व्‍यक्‍तीने नव्या सायकलवर खूप जुगाड करून एक म्युझिक सिस्‍टीम फिट केली आहे, ही म्युझिक सिस्टीम दिसायला जरी छोटी असली तरी त्यातून जबरदस्त आवाज येतोय. यासाठी व्यक्तीने सायकलच्या कॅरियरवर ६ स्पीकर्सचा सेट आणि एक पायोनियर वूफर सेट लावला आहे. याशिवाय त्याच्या वर एक बॅटरी देखील ठेवली आहे. शिवाय संपूर्ण म्युझिक सिस्टीम कंट्रोल सीटच्या समोरील जागेवर सेट केला आहे. आता बाकीच्या गोष्टी तुम्हीच व्हिडीओमध्ये पाहा. म्युझिकवरील प्रेमापोटी या व्यक्तीने केलेला हा देसी जुगाड खूपच जबरदस्त आहे.

छंद मोठी गोष्ट आहे भावा

View this post on Instagram

A post shared by Sharafu Mohammed (@iamautomotivecrazer)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडिओ ‘युनायटेड अरब अमिराती’ (यूएई) आधारित इन्स्टाग्राम पेज @iamautomotivecrazer ने पोस्ट केला आहे, ज्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगतेय. या व्हिडीओ आत्तापर्यंत ३७ लाख व्ह्यूज आणि १ लाख ४३ हजार लाईक्स मिळाले आहेत. याशिवाय शेकडो युजर्सनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिले की, छंद ही एक मोठी गोष्ट आहे भावा… हा आपल्या कारचा छंद सायकलवर पूर्ण करतो. दुसऱ्या युजरने लिहिले की, भावा, बॅटरी मोठी ठेवाची होतीस. तर आणखी एका युजरने या व्यक्तीच्या छंदाचे कौतुक करत म्हटले की, याच्या पुढे कारची म्युझिक सिस्टीम देखील फेल आहे.